जकार्ता, आशियाई पॅरा स्पर्धा : जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा स्पर्धेत भारताने पहिले सुवर्णपदक जिंकले. भारताला भालाफेकपटू संदीप चौधरीने या स्पर्धेत 60.01 मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या पदकासह भारताच्या खात्यात एक सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकून 9 पदके जमा झाली आहेत.
संदीपने पहिल्या प्रयत्नात 54.31 मीटर भालाफेक केली. त्यात सातत्याने सुधारणा करताना त्याने पुढील तीन प्रयत्नांत 57.27, 60.01, 59.50 आणि 56.64 मीटर भालाफेक केला. तिसऱ्या प्रयत्नातील अंतर त्याला सुवर्णपदक जिंकून देण्यासाठी पुरेसे ठरले. श्रीलंकेच्या हेत्ती अराचचिगे चामिंडा ( 59.32 ) आणि इराणच्या ओमिदी अली ( 58.97 ) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले.