शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

कुस्ती, फुटबॉलपाठोपाठ नेमबाजीत कोल्हापूर जगाच्या नकाशावर

By संदीप आडनाईक | Published: August 02, 2024 1:44 PM

जयसिंहराव कुसाळे नेमबाजीचे प्रेरणास्थान : १९५८ पासून खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास

संदीप आडनाईककोल्हापूर : क्रीडानगरी कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर सातत्याने गाजते आहे. कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, हॉकी खेळापाठोपाठ नेमबाजीतही येथील खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत कोल्हापुरचे नाव जगाच्या नकाशावर आणलेले आहे. जिल्ह्यातील राधानगरीचा नेमबाज २८ वर्षीय स्वप्नील कुसाळे याने ५० मीटर एअर रायफल नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत कास्यपदक पटकावल्यामुळे नेमबाजीत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुराच रोवला आहे.नेमबाजीत कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्याचे काम जयसिंहराव कुसाळे यांनी १९५८ मध्ये सर्वप्रथम केले. कुसाळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत दोन हजारांवर नेमबाजांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे. जयसिंहराव कुसाळे यांना नेमबाजीतील कामगिरीबद्दल १९७६-७७ आणि पाठोपाठ १९७७-७८ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराचा बहुमान त्यांचे चिरंजीव रमेश यांनाही १९ व्या वर्षी मिळाला. एकाच घरात लागोपाठ दोन वर्षे पितापुत्रांना हा पुरस्कार मिळण्याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे.

नेमबाजीत कोल्हापूरकर पुढेचनेमबाजीत कोल्हापूरच्या बाळासाहेब पिरजादे, मंझील हकीम, प्रताप इंगळे, ऋतुराज इंगळे, सागर शेळके, राजेंद्र डफळे, संजय पाटील, रवी पाटील, नवनाथ फडतारे, संदीप तरटे, फुलचंद बांगर, मनमित राऊत, कनय्या बाबर, जितेंद्र विभुते, युवराज चौगुले, महादेव गायकवाड, राठोड या नेमबाजांनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळविली. १९८२ मध्ये अजित खराडे, शिवराज सुर्वे या नेमबाजांसह रमेश कुसाळे यांनी अमेरिका दौरा केला. १९८२ मध्ये दिल्ली येथील नवव्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही रमेश यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यावर्षी पुन्हा त्यांची निवड ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे झालेल्या १२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाली. २००१ पासून गेली १९ वर्षे ते अजित खराडे, रमेश कुसाळे, प्रमोद पाटील, अजित पाटील, कल्पना कुसाळे, युवराज साळोखे, दीपक चव्हाण यांच्या सहकार्याने नवोदित नेमबाजांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतात. कोल्हापूरच्याच राधिका बराले-हवालदार हिने कोलंबो (श्रीलंका) येथील २१ ऑगस्ट २००६ मध्ये दक्षिण आशियाई गेम्समध्ये १० मीटर एअररायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१५ नंतर अभिज्ञा पाटीलनेही ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत पदक पटकावले.

तेजस्विनी, राही सरनोबत, शाहू माने यांचीही दमदार कामगिरीविश्वचषक नेमबाजी स्पर्धेत तेजस्विनी सावंत हिने १० मीटर एअर रायफल प्रकारात विजेतेपद पटकावणारी ती पहिली महिला भारतीय ठरली. राही सरनोबत ही २२ ऑगस्ट २०१८ मध्ये एशियाडमध्ये १० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. २०१८ मध्ये कोल्हापूरच्या शाहू तुषार माने या १७ वर्षीय आंतरराष्ट्रीय नेमबाजाने अर्जेंटिना (ब्युईनस एअरज) येथील युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेची चॅम्पियन राही सरनोबतने २०२१ मध्ये नवी दिल्लीतील ६४ व्या राष्ट्रीय नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सलग तिसऱ्यांदा जेतेपद पटकावून सुवर्णपदक पटकावले. २०२२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरच्या अभिज्ञा अशोक पाटील हिने २५ मीटर स्पोर्टस पिस्तूल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. यापूर्वी तिने आशियाई स्पर्धेत कांस्य, तर जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती. स्वप्निल कुसाळे यानेही २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं. गोखले कॉलेजच्या अनुष्का पाटीलने सांघिक युवा गटात १० मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. २०२४ मध्येच सोनम म्हसकरने विश्वचषक नेमबाजीत १० मीटर एअर रायफल्समध्ये रौप्यपदक पटकावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWrestlingकुस्तीFootballफुटबॉलShootingगोळीबार