शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

'डेरवण यूथ गेम्स' ॲथलेटिक्समध्ये पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू चमकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 6:44 PM

चिपळूण - एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित डेरवण यूथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धांतील सामने रंगत आहेत.

चिपळूण - एसव्हीजेसीटीतर्फे आयोजित डेरवण यूथ गेम्स २०२३ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात विविध खेळांच्या स्पर्धांतील सामने रंगत आहेत. ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारात पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. कोल्हापूर, सांगली, सातारा या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली.

डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात शिवजयंतीनिमित्त ‘डीवायजी २३’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील विविध क्रीडा स्पर्धांत राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने आलेले खेळाडू सहभागी होत आहेत. २०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुली  ) स्पर्धेत साताऱ्याची निकिता पवारने सुवर्णपदक पटकाविले. ८०० मीटर धावणे ( १६ वर्षांखालील मुली  ) सांगलीच्या अनुष्का चव्हाणने सुवर्णपदक मिळविले. गोळाफेकमध्ये ( १४ वर्षांखालील मुले  ) सांगलीच्या अनिरुद्ध नलावडेने सुवर्णपदक तर मुलींच्या गटात सांगलीच्या सिद्धी शिर्केने सुवर्णपदक पटकाविले. लांब उडी स्पर्धेत ( १८ वर्षांखालील मुले  ) सांगलीच्या धैर्यशील ढेरे आणि साताराच्या वेदांत मोरे ( १६ वर्षांखालील मुले  ) यांनी सुवर्णपदक जिंकले. अॅथलेटिक्समधील १०० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे, रिले, लांब उडी, गोळाफेक या स्पर्धा सुरू असून, त्यासाठी एकूण ८७८ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. तर रिलेच्या एकूण १०६ संघांमध्ये चुरस रंगणार आहे. 

स्पर्धेचे निकाल२०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुली  )१ निकिती पवार, सातारा२ तनिष्का दांगट, पुणे३ सानिका मोरे, कोल्हापूर

८०० मीटर धावणे ( १८ वर्षांखालील मुले  )१ स्वराज जोशी, रत्नागिरी२ अभिजीत वागरे, सांगली ३ उमेश अजमाने, सातारा

८०० मीटर धावणे ( १६ वर्षांखालील मुली  )१ अनुष्का चव्हाण, सांगली२ पद्मिनी भिटाळे, रत्नागिरी३ आयेश मुजावर, कोल्हापूर

४ बाय ५० मिश्र रिले ( १० वर्षांखालील  )एसएसए, कोल्हापूरवेदांत अॅथलेटिक क्लब, कोल्हापूरआश्रमशाळा, रत्नागिरी

४ बाय १०० मिश्र ( १८ वर्षांखालील  )हिरकणी, साताराएनपी स्पोर्टस, कोल्हापूरएसव्हीजेसीटी, डेरवण

४ बाय १०० मिश्र ( १६ वर्षांखालील  )टीएमसीपीवाय, ठाणेगुरुकूल स्कूल, साताराएसव्हीजेसीटी, डेरवण

लांब उडी ( १६ वर्षांखालील मुले  )१ वेदांत मोरे, सातारा२ ऋग्वेद आंबे, सांगली३ हर्षवर्धन पाटील, कोल्हापूर

लांब उडी ( १६ वर्षांखालील मुली  )अदा पठाण, ठाणेजान्हवी खैरनार, नाशिकश्रेष्ठा शेट्टी, ठाणे

लांब उडी ( १८ वर्षांखालील मुली  )धैर्यशील ढेरे, सांगलीअली शेख, ठाणेप्रमोद जाधव, सांगली

गोळाफेक ( १४ वर्षांखालील मुले  )अनिरुद्ध नलावडे, सांगलीअथर्व परब, ठाणेआयुष खाप, सातारा

( १४ वर्षांखालील मुली )सिद्धी शिर्के, सांगलीप्रिशा नाईक, ठाणेसाईशा पवार, ठाणे

पुण्याच्या अक्षज पाटील बुद्धिबळपटूला सुवर्णबुद्धिबळ स्पर्धेत पुण्याच्या अक्षज पाटीलने सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक कोल्हापूरच्या शंतनू पाटीलने तर कोल्हापूरच्या व्यंकटेश खाडे पाटीलने कांस्यपदक मिळविले. मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडूंचा मान पद्मश्री वैद्य, रत्नागिरी, सई प्रभूदेसाई रत्नागिरी आणि भूमी कामत, सिंधुदुर्ग या बुद्धिबळपटूंनी मिळविला.वॉल क्लायम्बिंगवर पुण्याचे वर्चस्व

वॉल क्लायम्बिंग या स्पर्धेवर पुणे आणि लोणावळा येथील खेळाडूंनी पूर्णपणे वर्चस्व गाजविल्याचे पाहायला मिळाले. १० वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १८ वर्षांखालील मुले आणि मुली या सर्वच गटांमध्ये तीनही क्रमांक पुणे आणि लोणावळा येथील खेळाडूंनी पटकाविले.

 

टॅग्स :ChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी