रांची : आॅस्टे्रलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील टीम इंडियाच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेला उधाण आले असताना, संघ प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मात्र भारतीय खेळाडूंना पाठिंबा दिला आहे. ‘संघातील खेळाडूंना आपल्या आक्रमकतेवर लगाम घालण्याबाबत कोणतीही सूचना देणार नाही,’ असे वक्तव्य कुंबळे यांनी केले. तिसऱ्या कसोटीपूर्वी बोलताना कुंबळे म्हणाले, ‘‘जर खेळाडू मैदानात अपेक्षित असलेली कामगिरी करीत असतील, तर त्यांच्या नैसर्गिक खेळाला रोखण्याचा मी प्रयत्न करणार नाही. आपल्याला आक्रमकतेवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची स्वत:ची एक शैली असते.’’आक्रमकतेबाबत कुंबळे म्हणाले, ‘‘खेळाडूने मैदानावर उतरून स्वत:ला सिद्ध करावे हीच प्रत्येकाची इच्छा असते. ही मालिका महत्त्वपूर्ण असून सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघ या सामन्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. मला पूर्ण विश्वास आहे, की विजय क्रिकेटचाच होईल.’’ दुसऱ्या कसोटी सामन्यात डीआरएस पर्याय वापरण्यावरून मोठा गोंधळ उडाला होता. आॅसी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या निर्णयाविरुद्ध बीसीसीआयने आयसीसीकडे तक्रार केल्यानंतर क्रिकेट आॅस्टे्रलिया आणि बीसीसीआय यांनी संयुक्तपणे या प्रकरणावर पडदा टाकला, याविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘क्रिकेट या महान खेळाचा संरक्षक म्हणून आमची सर्वांची ही जबाबदारी आहे, की अशा प्रकारची प्रकरणे योग्यरीतीने हाताळणे. या खेळाचे मुख्य हितधारक खेळाडू असून त्यांना आपल्यावरील जबाबदारीची जाणीव असावी.’’बंगळुरू डीआरएस प्रकरणावरून बीसीसीआय आणि सीए यांनी संयुक्तपणे जो काही निर्णय घेतला तो महत्त्वपूर्ण आहे. कारण, खेळावर मुख्य लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आम्ही पहिला सामना गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले, असेही कुंबळे म्हणाले. (वृत्तसंस्था) एकूणच दुसऱ्या कसोटीतील वादामुळे आमच्या खेळावर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही केवळ खेळू इच्छितो. या सर्व गोष्टींची आम्ही काहीच चर्चा करीत नसून ही चर्चा इतर सर्वांकडून होत आहे. आम्ही केवळ खेळत असून मैदानावर होत असलेल्या खेळाविषयी विचार करीत आहोत. - अनिल कुंबळे‘स्लेजिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाऊल उचलायला हवे’मेलबोर्न : स्लेजिंगचा विचार करताना आॅस्ट्रेलिया भारतावर अंगुलीनिर्देश करण्याच्या स्थितीत नाही; पण प्रशासकांनी उपाययोजना करीत मैदानावरील आक्रमकता रोखायला हवी, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान चॅपेलने व्यक्त केले. चॅपेल म्हणाला, ‘अधिकाऱ्यांनी मैदानावरील स्लेजिंगच्या विरोधात कडक पावले उचलायला हवी. आॅस्ट्रेलिया संघ या स्थितीत भारताकडे अंगुलीनिर्देश करू शकत नाही. कारण, आॅस्ट्रेलियन संघ काही धुतल्या तांदळासारखा नाही. उभय संघांदरम्यान आतापर्यंत बरेच स्लेजिंग झाले असून, आरोप-प्रत्यारोपही झाले आहेत. या मालिकेत उभय संघातर्फे तुल्यबळ खेळ अनुभवाला मिळत आहे; पण क्रिकेटच्या मैदानावर अशा प्रकारचे वर्तन कायम ठेवण्यास परवानगी देणे म्हणजे प्रशासकांचा मूर्खपणा ठरेल.’ चॅपेल पुढे म्हणाले, ‘जर असेच घडत राहील तर अडचणी वाढतील.
खेळाडूंच्या आक्रमकतेस मुरड नाही
By admin | Published: March 15, 2017 1:24 AM