मेलबोर्न : वर्षातील पहिल्या ग्रॅण्डस्लॅम आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या सुरुवातीलाच मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे टेनिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यात जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोवीच याने फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता, असा खुलासा केला आहे. दरम्यान, टेनिस वर्तुळातील जाणकार आणि नजीकच्या सूत्रानी या खेळात फिक्सिंग आणि मोठा भ्रष्टाचार होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. सिडनीमध्ये एक टेनिस जाणकार स्टीव्ह जियोर्गाकीस म्हणाले, ‘‘ग्रॅण्डस्लॅम, आॅलिम्पिक आणि ओपन यासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये आवडीचे खेळाडू नेहमीच जिंकतात; पण छोट्या स्पर्धांमध्ये अव्वल ५० मध्ये समावेश असलेले खेळाडू दुखापत किंवा अन्य काही कारणांमुळे सहभागी होत नाहीत. तरी त्यामुळे त्यांच्या मानांकनावर परिणाम होत नाही. त्यामुळे फिक्सर्ससाठी ही योग्य संधी असल्याची शंका येते. छोट्या स्पर्धांमध्ये अव्वल मानांकित खेळाडूंनी विजय मिळविला तरी कमी रक्कम मिळते; पण ते मुद्दाम पराभूत झाले किंवा दुखापतीमुळे माघार घेतली, तर त्यांना मोठी रक्कम कमावण्याची संधी असते. यात फिक्सिंगमध्ये अडकण्याचा धोकाही नसतो.’’जाणकारांच्या मते, फुटबॉलनंतर क्रीडाजगतात टेनिसमध्ये मॅच फिक्सिंगचा सर्वांत आकर्षक बाजार आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये आॅनलाईन आणि मोबाईल गॅम्बलिंग वेबसाईटमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या फिक्सिंगची वार्षिक उलाढाल ३० दशअब्ज डॉलरची असल्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)कारकिर्दीच्या सुरुवातीलाच फिक्सर्सनी संपर्क साधला होता. ही घटना २००७ची आहे. त्या वेळी फिक्सर्सनी फिक्सिंगसाठी माझ्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यासोबत त्यांनी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नसला, तरी माझ्यासोबत जुळलेल्या लोकांच्या माध्यमातून ते माझ्याशी संपर्क साधण्यास प्रयत्नशील होते. या घटनेनंतर सात-आठ वर्षे मी यासोबत ताळमेळ साधणारे वृत्त ऐकले नाही. फिक्सिंग गुन्हा असून, खिलाडू वृत्तीच्या विरोधात आहे. अशा कृतीसोबत जुळवून घेणे मला आवडत नाही. टेनिसमध्ये नेहमी प्रामाणिकपणा कायम राहिलेला आहे आणि त्यामुळेच हा खेळ प्रसिद्ध आहे.- नोवाक जोकोविच
फिक्सर्सचा संपर्क साधण्याचा प्रयत्न
By admin | Published: January 19, 2016 3:26 AM