लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याची परंपरा आणि महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. मात्र, लॉडर््सवर कसोटी पाहणे ही अत्यंत महागडी गोष्ट आहे, हे खूप कमी लोकांना माहीत असेल. लॉडर््सवरील कसोटीसाठी दररोज १०० पौंडचे (अंदाजे १० हजार रुपये) तिकीट घ्यावे लागते. पहिल्या चार दिवसांसाठी प्रत्येकी १०० पौंड आणि शेवटच्या दिवसासाठी २० पौंड मोजावे लागतात. यामुळे लॉडर््सवर संपूर्ण कसोटी पाहण्यासाठी सुमारे ४२,००० रुपये खर्च येतो.> २०० आणि अधिक ... लॉडर््सवरील भारत आणि इंग्लंड दरम्यानची ही कसोटी मेलबर्न क्रिकेट क्लब (एमसीसी)साठी विशेष महत्त्वाची आहे. ‘एमसीसी’ लॉडर््स मैदानाचा २००वा वाढदिवस साजरा करत आहे. काही दिवसांपूर्वीच लॉडर््सच्या २००व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली ‘एमसीसी’ आणि शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली ‘रेस्ट आॅफ वर्ल्ड’ या दोन संघांदरम्यान सामना झाला होता. या कसोटीला मोठी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. लॉडर््सची खेळपट्टी इंग्लिश गोलंदाजांना फायदा होईल, अशीच ठेवण्यात आली आहे. खेळपट्टी गवताने आच्छादलेली आहे.> बॉयकॉट यांना पुन्हा भारतात यायचयसर जेफ्री बॉयकॉट यांच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. गेल्या दहा वर्षांपासून ते गळ्याच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. इंग्लंडच्या या थोर कसोटीपटूचा ७७व्या वर्षीचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. अजूनही ते क्रिकेटबाबत तेवढेच उत्साही असतात. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या जिभेला कोणतीही चव नाही. भारताविषयी विशेष ममत्व असणाऱ्या बॉयकॉट यांना भारतात येणे खूप आवडते. ‘मला भारतीय खूप आवडतात. भारतातील लोक क्रिकेटवर प्रचंड प्रेम करतात. ‘आयपीएल’ स्पर्धेसाठी मी भारतात येणार होतो; मात्र काही कारणाने ते राहून गेले. मी पुढील वेळी नक्की येईन’, असे ते आत्मविश्वासाने सांगतात.> ३११चा पाठलाग करताना कपिलच्या १७५ !आता १९८३ च्या विश्वचषकाकडे; परंतु भारताला झिम्बाबेविरुद्ध ३११ धावांचे लक्ष्य होते, हे किती जणांना माहीत आहे. या सामन्यात कपिल देवने नाबाद १७५ धावा काढल्या होत्या. या विजयाबद्दल खूप गोष्टी अजूनही कोणाला माहीत नसल्याचे कपिल देव यांनी सांगितले. कपिल देव म्हणाले, आम्ही संघाच्या बैठकीत झिम्बाबेनंतरच्या सामन्याविषयी चर्चा करत होतो. आम्हाला त्यानंतर आॅस्ट्रेलियाबरोबर खेळावे लागणार होते. यामुळेच भारताची स्थिती ५ बाद १७ अशी झाली का? या प्रश्नावर ते म्हणाले, नाही. त्या दिवशी ढगाळ वातावरण होते. चेंडू स्विंग होत होता. मात्र, कोणताही फलंदाज बिट होत नव्हता, तर तो सरळ बाद होत होता आणि असे क्रिकेटमध्ये खूपदा घडते. कित्येकदा तुम्ही बिट होत असता आणि बाद होत नाही. मात्र, काही वेळा तुम्ही पहिल्याच चेंडूवर बाद होता.
लॉर्ड्सवर प्रेक्षकांसाठी कसोटी खर्चीक
By admin | Published: July 18, 2014 2:13 AM