ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ९ - ख्रिस रॉजर्स (५६), कर्णधार स्मिथ (७१)व बर्न्स (६६)यांच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीत २५१ धावा केल्या असून त्यांच्याकडे ३४८ धावांची आघाडी आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपताना हॅडिन (३१) व हॅरिस (०) खेळत असून ऑस्ट्रेलियाने ६ गडी गमावले आहेत.
सिडनी कसोटीत भारताचा पहिला डाव ४७५ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचे वॉर्नर (४) आणि वॉटसन (१६) पटापट बाद झाल्यानंतर ख्रिस रॉजर्सने (५६) कर्णधार स्मिथच्या साथीने ( नाबाद४७) ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला. मात्र अर्धशतक पूर्ण झाल्यावर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रॉजर्स रैनाकडे झेल देऊन तंबूत परला. तर स्मिथही ७१ धावावंर असताना बाद झाला. त्यानंतर बर्न्सने ६६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. भारतातर्फे अश्विनने ४ तर शमी व भुवनेश्वरने प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी कर्णधार विराट कोहलीच्या(१४७) शानदार खेळीनंतरही भारताचा डाव ४७५ धावांवर संपुष्टात आला. भारत ९७ धावांनी पिछाडीवर आहे. कोहली बाद झाल्यानंतर अश्विनने अर्धशतकी खेळी करत (५०) भारताला लक्ष्य गाठून द्यायचा प्रयत्न केला खरा, पण तळाच्या इतर फलंदाजांची पुरेशी साथ न मिळाल्याने भारताचा डाव गडगडला आणि सर्व गडी ४७५ धावांत बाद झाले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने ३, हॅरिस, लियॉन, वॉटसनने प्रत्येकी २ आणि हेझलवूडने १ बळी टिपला.