शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

आॅस्ट्रेलियाने दिला कर्णधार क्लार्कला विजयाने निरोप

By admin | Published: August 23, 2015 11:41 PM

पावसाचा व्यत्यय आलेल्या अ‍ॅशेज मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला

लंडन : पावसाचा व्यत्यय आलेल्या अ‍ॅशेज मालिकेतील अखेरचा आणि पाचवा कसोटी सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला. आॅस्ट्रेलियाने अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर एक डाव आणि ४६ धावांनी मात केली. स्टीव्हन स्मिथ सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.रविवारी आलेल्या पावसाच्या व्यत्ययात फॉलोआॅन घेऊन खेळणाऱ्या इंग्लंडचा दुसरा डाव २८६ धावांत आटोपला. इंग्लंडतर्फे दुसऱ्या डावात अ‍ॅलेस्टर कुक याने सर्वाधिक ८५ धावा केल्या. बटलरने ४२, मोईन अलीने ३५ आणि बेअरस्टॉने २६ धावांचे योगदान दिले. आॅस्ट्रेलियाकडून पीटर सीडलने ३५ धावांत ४ गडी बाद केले. त्याला लियोन आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. या यशामुळे आॅस्ट्रेलियाने या कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणारा त्यांचा कर्णधार मायकल क्लार्कला विजयी निरोप दिला. या सामन्यात इंग्लंडला पराभव पत्करावा लागला असला तरी ही प्रतिष्ठित अ‍ॅशेज मालिका त्यांनी ३-२ फरकाने जिंकली.त्याआधी, फॉलोआॅननंतर इंग्लंडने रविवारी सुरुवातीला ६ बाद २0३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आॅस्ट्रेलियाने दुसऱ्याच षटकात नवीन चेंडू घेतला आणि मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या पीटर सीडलने नाईट वॉचमन मार्क वूड (६) याला पायचीत करीत संघाला दिवसातील पहिले यश मिळवून दिले. कालचा नाबाद फलंदाज जोस बटलरदेखील ४२ धावा काढल्यानंतर मिशेल मार्शच्या चेंडूवर मिडआॅफवर स्टार्ककडे झेल देऊन तंबूत परतला. त्यामुळे इंग्लंडची स्थिती ८ बाद २२३ अशी झाली. ही बटलरची या मालिकेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. इंग्लंडची स्थिती ८ बाद २५८ अशी संकटात सापडल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि लवकरच उपाहारासाठी खेळ थांबविण्यात होता. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाल्यानंतर उपाहाराला १७ धावांवर खेळणारा मोईन अली (३५), स्टुअर्ट ब्रॉड (११) यांना बाद करीत पीटर सीडलने आॅस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ४८१. इंग्लंड : पहिला डाव १४९. दुसरा डाव १0१.४ षटकांत सर्वबाद २८६. (अ‍ॅलेस्टर कुक ८५, बटलर ४२, मोईन अली ३५, बेअरस्टॉ २६, पीटर सीडल ४/३५, मिशेल मार्श २/५६, लियोन २/५३, जॉन्सन १/६५, स्मिथ १/७).