कोची : सुनील (नाबाद १६३), मुहमद फरहान (५३), इक्बाल जाफर (नाबाद ३०) व इक्बाल जाफर (१/२०), अजयकुमार रेड्डी (२/११) यांच्या खेळाच्या जोरावर कोची येथे झालेल्या लढतीत भारतीय संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आॅस्ट्रेलिया संघाचा १२८ धावांनी पराभव केला. पुणे येथील पीवायसीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात श्रीलंका संघाने नेपाळला १३१ धावांनी नमविले. मुबंई येथील ब्रेबॉर्न स्टेडियमच्या मैदानावर वेस्ट इंडिज संघाने बांगलादेश संघाला ५ गडी राखून पराभूत केले. क्रिकेट असोसिएशन फॉर ब्लाइंड इन इंडियाच्या वतीने झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना श्रीलंका संघाने २० षटकांत २ बाद २७४ धावा केल्या. नेपाळ संघाचा डाव २० षटकांत ५ बाद १४३ धावांवर आटोपला. श्रीलंका संघ १३१ धावांनी जिंकला. कोची येथील राजगिरी मैदानावर झालेल्या या लढतीत सुनील (१६३ धावा) याच्या अफलातून नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारत संघाने आॅस्ट्रेलिया संघाचा १२८ धावांनी पराभव करत आगेकूच केली. मुंबई येथील ब्रेबॉर्न स्टेडियम मैदानावर झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने न्यूझीलंड संघाचा ८४ धावांनी पराभव केला.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका : २० षटकांत २ बाद २७४ धावा (रूवान वासंथा ७६ (४१ चेंडू, ८ चौकार), सुरंगा संपत १११ (४८ चेंडू,१९ चौकार, १ षटकार), कविदु दुरा नाबाद ३२ (१२ चेंडू), रूवान करुणाथिलाका ३३ (१८ चेंडू, ५ चौकार) वि. वि. नेपाळ : २० षटकांत ५ बाद १४३ धावा (सुनील मगर ३८ (३० चेंडू, ४ चौकार), क्रितन दुवाल नाबाद ३७ (४७ चेंडू, २ चौकार), पदम बाडिला नाबाद २३ (१८ चेंडू, ३ चौकार), मदुसंका रालाल्गी १-१४, चंदना कुमारा १-९); भारत : २० षटकांत बिनबाद २७२ धावा (सुनील नाबाद १६३ (७२ चेंडू, २९ चौकार), मुहम्मद फरहान ५३ (३५ चेंडू, ७ चौकार), इकबाल जाफर नाबाद ३० (१३ चेंडू) वि. वि. आॅस्ट्रेलिया : १८.३ षटकांत सर्व बाद १४४ धावा (डॅनियल प्रिचार्ड ३२ (४६ चेंडू), मॅथ्यू कॅमेरॉन २७ (२७ चेंडू), नेड मैगा १९ (१९ चेंडू, २ चौकार), रेमंड मॉक्सली १८ (१५ चेंडू, ४ चौकार), अजय कुमार रेड्डी २-११).वेस्ट इंडिज : २० षटकांत २ बाद ३२३ धावा (केविन डुगलस १६४ (६४ चेंडू, २८ चौकार), लेरॉय फिलिप्स ७६ (३८ चेंडू, ६ चौकार), डेनील शीम नाबाद ३३ (१४ चेंडू, ४ चौकार, १ षटकार) वि. वि. न्यूझीलंड : २० षटकांत ३ बाद २३९ धावा (बीडी विल्सन नाबाद १०६ धावा (७५ चेंडू,१३ चौकार), एमएलके मॅककॅसकील २१ (१२ चेंडू,४ चौकार), परवीन शंकर १० (७ चेंडू), जेएच डून ३५ (२३ चेंडू, ५ चौकार).
भारताकडून आॅस्ट्रेलिया पराभूत
By admin | Published: February 06, 2017 1:31 AM