शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

आॅस्ट्रेलियाची भारत दौऱ्याची तयारी दुबईत

By admin | Published: January 03, 2017 12:48 AM

अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे

सिडनी : अलीकडच्या कालावधीतील भारताची चमकदार कामगिरी बघितल्यानंतर आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियाने भारत दौऱ्याच्या तयारीसाठी दुबईमध्ये उपखंडातील खेळपट्ट्यांवर सराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत. भारताने अलीकडेच वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध मोठ्या फरकाने मालिका जिंकल्या आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या आठ कसोटी सामन्यांपैकी विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सात सामन्यांत विजय मिळविला आहे.

आॅस्ट्रेलियासाठी भारतात कसोटी विजय मिळविणे कठीण ठरले आहे. आॅस्ट्रेलियाला २००४ पासून भारतात एकही कसोटी सामना जिंंकता आलेला नाही. २०१३ च्या भारत दौऱ्यात त्यांना चार कसोटी सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आॅस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दुबई येथील अकादमीमध्ये शिबिर आयोजित करण्यास इच्छुक आहे. क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफॉरमन्स मॅनेजर पॅट होवर्ड म्हणाले, ‘भारतात प्रत्येक ठिकाणी परिस्थिती समान नसते. आयसीसीने अलीकडच्या कालावधीत चांगले कार्य केले आहे. त्यांनी विविध शहरांसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्ट्या तयार केल्या आहेत. त्यामुळे तेथे केवळ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्याच नाही तर विविध प्रकारच्या खेळपट्ट्या उपलब्ध आहेत. आम्हाला कुठल्या परिस्थितीला सामोरे जायचे आहे, त्याची नक्कल करता येणार नाही, पण केवळ परिस्थितीसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करता येईल. ’

आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध मंगळवारपासून सिडनीमध्ये प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघाची निवड करताना भारताविरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर लक्ष ठेवून केली आहे. या संघात नॅथन लियोन व स्टीव्ह ओ किफे अशा दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटू एस्टन एगर १३ सदस्यांच्या संघाचा सदस्य होता, पण त्याला अंतिम ११ मध्ये स्थान मिळवता आले नाही. भारत आणि आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान पहिला कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंडकडून प्रेरणादुबईमध्ये सराव करण्यासाठी आॅस्ट्रेलियाने निश्चितपणे इंग्लंडकडून प्रेरणा घेतली असेल. त्यांनी २०१२ मध्ये भारत दौऱ्यापूवी दुबईमध्ये सराव केला होता. त्यावेळी इंग्लंडने २-१ ने मालिका जिंकली होती. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिजने गेल्या वर्षी भारतात विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावण्यापूर्वी आयसीसीच्या अकादमीमध्ये वेळ घालविला होता.