सिडनी : आॅस्ट्रेलियाने उभारलेल्या ८ बाद ५३८ या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा डाव अडखळला. दोन गडी स्वस्तात परतल्यावर अनुभवी फलंदाज युनिस खान आणि अजहर अली यांच्या अर्धशतकाने पाकिस्तानचा डाव सावरला. डेविड वॉर्नर(११३) मॅट रेनशॉ (१८४), पीटर हॅण्ड्सकोम्ब(११०) यांच्या दमदार शतकी खेळींनंतर आॅस्ट्रेलियाने आपला डाव ८ बाद ५३८ धावांवर घोषित केला. त्यानंतर पाकिस्तानचे दोन गडी सहा धावातच बाद झाले. जोश हेझलवुड याने सलामीवीर शारजील खान चार धावांवर बाद केले. त्याच षटकात त्याने बाबर आझमला शुन्यावर पायचीत पकडले. त्यानंतर अजहर अली नाबाद ५८ आणि युनिस खान नाबाद ६४ यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने दोन गडी बाद १२६ धावा केल्या होत्या. पाकिस्तान आॅस्ट्रेलियापेक्षा अजून ४१२ धावांनी मागे आहे. आधीच मालिका गमावलेल्या पाकिस्तानची आजची सुरूवातही अनुकुल ठरली नाही. हेझलवुडने ३२ धावांत दोन गडी बाद केले. चहापानाच्या वेळी पाकिस्तानची धावसंख्या २ बाद १६ अशी होती. त्यानंतर युनिस आणि अजहर अली यांनी जबाबदारीने खेळ केला. त्यांनी दिवसाअखेर १२० धावांची भागिदारी केली. यात दोन्ही फलंदाजांनी जीवदानही मिळाले. दोन्ही फलंदाज धावबाद होतांना वाचले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया - पहिला डाव ८/५३८( मॅट रेनशॉ १८४,डेव्हिड वॉर्नर ११३, पीटर हॅण्ड्सकोम्ब ११०, हिल्टन कार्टराईट ३७, गोलंदाजी - इम्रान खान २/१११, वहाब रियाज ३/८९, यासिर शाह १/१६७, अजहर अली २/७०)पाकिस्तान- २/१२६(अजहर अली खेळत आहे ५८, शारजील खान ४, बाबर आझम ०, युनिस खान खेळत आहे ६४, गोलंदाजी - जोश हेझलवुड २/३२)
आॅस्ट्रेलियाने रचला धावांचा डोंगर
By admin | Published: January 05, 2017 2:24 AM