शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

आॅस्ट्रेलियाच विश्वविजेता !

By admin | Published: March 30, 2015 5:01 AM

वेगवान गोलंदाजांच्या अचूक माºयानंतर कारकिर्दीतील अखेरचा वन-डे सामना खेळणारा कर्णधार मायकल क्लार्कच्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा १०१ चेंडू व

मेलबोर्न : वेगवान गोलंदाजांच्या अचूक माºयानंतर कारकिर्दीतील अखेरचा वन-डे सामना खेळणारा कर्णधार मायकल क्लार्कच्या आकर्षक अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने रविवारी अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा १०१ चेंडू व ७ गडी राखून पराभव करीत पाचव्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. मिशेल जॉन्सन, जेम्स फॉल्कनर व मिचेल स्टार्क यांच्या अचूक माºयाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने अंतिम लढतीत न्यूझीलंडचा डाव ४५ षटकांत १८३ धावांत गुंडाळला. १९८३ च्या विश्वकप स्पर्धेत भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध अंतिम लढतीत १८३ या धावसंख्येचा यशस्वी बचाव केला होता, पण न्यूझीलंडला आज इतिहासाची पुनरावृत्ती करता आली नाही. आॅस्ट्रेलियाने ३३.१ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावांची मजल मारत जेतेपदाला गवसणी घातली. मायदेशात जेतेपद पटकावणारा आॅस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला आहे. आॅस्ट्रेलियाने यापूर्वी १९८७, १९९९, २००३ आणि २००७ मध्ये विश्वविजेतेपद पटकावले आहे. क्लार्कने चॅम्पियन म्हणून वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. अंतिम सामन्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे क्लार्कने यापूर्वीच जाहीर केले होते. आॅस्ट्रेलिया संघ झळाळत्या चषकासह ३९ लाख ७५ हजार डॉलर्स पुरस्काराचा मानकरी ठरला; तर न्यूझीलंड संघाला १७ लाख ५० हजार डॉलर्स पुरस्कार राशीवर समाधान मानावे लागले. २०११ मध्ये जेतेपद पटकावणारा भारत मायदेशात विजेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला होता. यासाठी आॅस्ट्रेलिया संघाला आज मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागला नाही. आॅस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर कसलेच दडपण जाणवले नाही. क्लार्कने १२ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेलला पाचारण केले. त्याने गुप्तिलला माघारी परतवत कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. विलियम्सनची संघर्षपूर्ण खेळी जॉन्सनने संपुष्टात आणली. त्यानंतर इलियट व टेलर यांनी डाव सावरला. टेलरला फॉल्कनरने तंबूचा मार्ग दाखवीत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला. कोरी अ‍ॅण्डरसन (०), ल्यूक रोंची (०) व व्हेटोरी (९) यांना छाप सोडता आली नाही. जॉन्सन (३-३०), फॉल्कनर (३-३६) व स्टार्क (२-२०) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. त्यानंतर क्लार्क (७४), स्टिव्हन स्मिथ (नाबाद ५६) आणि डेव्हिड वॉर्नर (४५) यांनी आॅस्ट्रेलियाला सहज लक्ष्य गाठून देताना अंतिम लढतीत रंगतदार या शब्दाला स्थान मिळू दिले नाही. न्यूझीलंडतर्फे उपांत्य फेरीतील स्टार ग्रँट इलियटने ८२ चेंडूंमध्ये ८३ धावांची खेळी केली, पण त्याला दुसºया टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही. किवी संघाचे सात फलंदाज १० षटकांत ३३ धावांत तंबूत परतले.
 
 
 
> एमसीजीवर तेंडुलकरचा जलवा सचिन तेंडुलकरच्या हातात आता बॅट नसली तरी या महान क्रिकेटपटूच्या लोकप्रियतेत किंचीतही कमी झालेली नाही़ आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वर्ल्डकपच्या फायनलदरम्यान क्रिकेटपटूंनी मोठ्या उत्साहात सचिनचे मैदानात स्वागत केले़ आॅस्ट्रेलियाने या लढतीत बाजी मारल्यानंतर समारोप समारंभात तेंडुलकर हे सर्वात मोठे नाव होते़ जेव्हा हा वरिष्ठ खेळाडू मैदानावर आला तेव्हा उपस्थित हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले़
 
 
 
> विश्वचषक स्पर्धेत अर्धशतक उपांत्य व अंतिम सामन्यात सलग अर्धशतक झळकावण्याची कामगिरी एकूण ६ फलंदाजांनी केली. ग्रँट एलियट आणि मायकल क्लार्क यांनी अशी कामगिरी करताना अनुक्रमे पाचवे व सहाव्या फलंदाजाचा मान मिळवला. याआधी अशी कामगिरी माईक ब्रेरली (१९७९), डेव्हिड बून (१९८७), जावेद मियांदाद (१९९२) आणि अरविंद डीसील्व्हा (१९९६) यांनी केली आहे. > चॅम्पियन बनवून नायकाचा अलविदा आॅस्ट्रेलिया संघ‘नायक’ मायकल क्लार्क याने पाचव्यांदा टीमला विश्वचॅम्पियन बनवून ९३ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्वप्नवत वन-डे कारकिर्दीला अलविदा केला़ क्लार्कने २४५ वन-डे सामन्यांत ७,९८१ धावा बनविल्या आहेत. त्यात ८ शतके आणि ५८ अर्धशतकांचा समावेश आहे़
 
 
 
> मालिकावीर : आॅस्ट्रेलियाच्या सर्वाधिक विकेट घेणारा मिचेल स्टार्कने ८ डावांत २२४ धावा देत एकूण २२ विकेट घेतल्या. या स्पर्धेत त्याची उत्कृष्ट कामगिरी न्यूझीलंडविरुद्ध २८ धावांत ६ विकेट अशी होती.
 
 
 
> जेम्स फॉल्कनर अंतिम लढतीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने या लढतीत मोक्याच्या क्षणी तीन बळी घेतले.
 
 
 
> सर्वाधिक धावा न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तिलने या स्पर्धेत ९ डावांमध्ये सर्वाधिक ५४७ धावा केल्या. यात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद २३७ धावांची खेळी केली होती. त्याने एकूण दोन शतके व एक अर्धशतक केले. त्याने ५९ चौकार व १६ षटकार ठोकले आहेत.