शहरं
Join us  
Trending Stories
1
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
2
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
3
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
4
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
5
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
6
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
7
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव
8
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
9
T20 World Cup 2024 : 'स्वप्न'पूर्तीसाठी टीम इंडिया सज्ज! 'मन' खूप झालं आता 'जग' जिंकण्यासाठी हरमन है तय्यार
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ठरणार भवितव्य
11
शेअर बाजारावर बॉट्सचा ताबा, FII ट्रेडर्सनं अल्गोरिदममध्ये फेरफार केला; ५९००० कोटींची कमाई : SEBI
12
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
13
"मी शरद पवारांना दैवत मानत आलोय", अजित पवार सुप्रिया सुळेंवर का भडकले?
14
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
15
पाकिस्तान क्रिकेटला लवकरच 'अच्छे दिन'! कोच कर्स्टन यांना विश्वास; खेळाडूंसमोर ठेवल्या ३ अटी
16
KL राहुल मर्जीतला; टीम इंडियात सुरुये Sarfaraz Khan ला रिलीज करण्याचा विचार
17
Monkeypox : टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट
18
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
19
Munawar Faruqui buys Flat in Mumbai: मुनव्वर फारुकीने मुंबईत खरेदी केला कोट्यवधींचा फ्लॅट, कुठून होते इतकी कमाई?
20
नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन

By admin | Published: November 27, 2014 10:24 AM

सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २७ -सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. ह्युजच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
शेफिल्ड शिल्ड सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटचा एक उसळता चेंंडून ह्युजला लागला व गंभीर दुखापत झाल्याने तो मैदानातच कोसळला. सुरुवातीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले व नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली व त्याला अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
नोल्स राज्यातील एक लहान गावात जन्मलेल्या ह्युजने २६ कसोटी व २५5 वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, राष्ट्रीय संघात त्याला त्याचे स्थान पक्के करता आले नाही. ह्युजला आखुड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासत होती. त्यामुळे त्यावर टीकाही झाली.कर्णधार क्लार्क दुखापतग्रस्त झाल्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर ह्युजला भारताविरुद्ध 4 डिसेंबरपासून प्रारंभ होणा-या ब्रिसबेन कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले होते, मात्र त्याच्या मृत्युमुळे त्याची ही संधी कायमचीच हुकली.
दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून त्यामुळे  क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी वापरण्यात येणा-या वस्तूंच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली आहे. 
फिलच्या मृत्यूचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असून अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त करत फिलला श्रद्धांजली वाहिली.
 
सचिन तेंडुलकर - फिल ह्यूजचा मृत्यू हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो. 
 
ब्रेट ली - फिलच्या मृत्यूचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. त्याचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या दु:खा मी सहभागी आहे. 
 
विराट कोहली - फिल ह्युजच्या मृत्यूच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटसाठी हा खूपच वाईट दिवस आहे. फिलच्या कुटुंबियांना हे दु:ख पचवायची शक्ती मिळो. 
 
युवराज सिंग - फिल ह्युज गेला यावर विश्वासच बसत नाही. आजचा दिवस क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आहे. 
 
सुरेश रैना - फिल तू नेहमी आमच्या हृदयात राहशील. 
 
हर्षा भोगले - सर्वांच्या आयुष्यात आनंद आणणारा क्रिकेटचा हा खेळ आज अतिशय दु:खा आहे. फिलच्या आत्म्यास शांती लाभो. 
 
 फिल ह्यूजची कारकीर्द : 
- २६ फेब्रुवारी २००९  रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिली कसोटी. 
- ११ जानेवारी २०१३ मध्ये श्रीलंकेविरोधा पहिला वन डे सामना खेळला. 
- १८ जुलै २०१३ रोजी इंग्लंड विरोधातील सामना त्याची अखेरची कसोटी होती. 
 
प्रथमश्रेणी कारकीर्द
सामने - ११४ 
धावा - ९०२३
सरासरी - ४६.५१ 
शतके -   २६
अर्धशतकं -४६  
सर्वोत्तम धावसंख्या नाबाद-  २४३
 
कसोटी कारकीर्द
सामने- २६
धावा - १५३५ 
सरासरी- ३२.६५ 
शतके - ३ 
अर्धशतके - ७ 
सर्वोत्तम धावसंख्या - १६० 
 
वन डे कारकीर्द
सामने -२५ 
धावा-  ८२६
सरासरी- ३६.९१ 
शतके- २
अर्धशतके - ४
सर्वोत्तम धावसंख्या नाबाद - १३८