शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
4
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
5
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
6
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
7
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
8
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
9
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
10
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
11
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
12
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
13
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
14
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
15
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
16
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
17
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
18
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
19
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
20
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आॅस्ट्रेलियन ओपन : फेडररने नदालला हरवून जिंकले १८ वे ग्रॅँडस्लॅम

By admin | Published: January 30, 2017 3:32 AM

चुरशीच्या झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात केली आणि आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकाविले.

मेलबोर्न : महान टेनिसपटू रॉजर फेडररने वय वाढले असले तरी आपल्यात अजूनही विजयाची भूक शिल्लक असल्याचे दाखवून देत अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात केली आणि आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकाविले. या विजयाने फेडररचा साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. मेलबोर्न पार्कवरील हे त्याचे पाचवे विजेतेपद असून, कारकिर्दीतील अठरावे ग्रँडस्लॅम आहे. उल्लेखनीय म्हणजे फेडररने २०१० नंतर प्रथमच आॅस्ट्रेलियन ओपनचे आणि २०१२ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. याआधी फेडररने २०१२ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर मात्र तब्बल साडेचार वर्षे अनेक वेळा ग्रॅँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठूनही त्याला विजेतेपद पटकाविता आले नव्हते. अखेर आज त्याने नदालला नमवित ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आणली. टेनिसच्या पुरुष एकेरीमधील दोन दिग्गज असलेल्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील अंतिम लढत तब्बल तीन तास ३८ मिनिटे रंगली. त्यांच्यातील धडाकेबाज खेळ पाहताना कोर्टवर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांबरोबरच आजी-माजी टेनिसपटूंच्याही काळजाचा ठोका चुकत होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत फेडररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. मात्र, नदालने दुसऱ्या सेटमध्ये ६-३ ने बाजी मारत सामन्यात कमबॅक केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा आपला खेळ उंचावताना हा सेट ६-१ ने जिंकला; मात्र चौथ्या सेटमध्ये नदालने फेडररला मात देत या सेटवर ६-३ ने कब्जा केला. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडविले. त्याने या सेटमध्ये नदालने घेतलेली आघाडी मोडून काढत जोरदार मुसंडी मारली आणि सेट ६-३ ने जिंकत सेटसह आॅस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. विजयानंतर फेडररने मैदानावर जल्लोष केला. या वेळी त्याला आनंदाश्रू अनावर झाले होते.(वृत्तसंस्था)