मेलबर्न : आतापर्यंत |स्ट्रेलियन ओपनमध्ये सातवेळा जेतेपदाचा मान मिळविणारा नोव्हाक जोकोविच सलग १२ सामने जिंंकले असून आज, रविवारी येथे जेतेपद पटकाविले. तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर दाखल होईल; पण त्याच्यापुढे आव्हान आहे अनेक दिग्गजांना पराभूत करीत आत्मविश्वास उंचावलेल्या डोमिनिक थिएमचे.
सर्बियाच्या जोकोविचची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कारकिर्दीतील कामगिरी ६-४ अशी आहे. थिएमने गेल्या पाचपैकी चार सामन्यांत सरशी साधली आहे. थिएमची प्रशंसा करताना जोकोविच म्हणाला, ‘त्याला पुढील पिढीतील म्हणणे चुकीचे ठरेल कारण तो प्रदीर्घ कालावधीपासून खेळत आहे. आता तो अव्वल पाच, अव्वल १० मधील खेळाडू आहे.’
जोकोविच पुढे म्हणाला, ‘येथे आणखी एक सामना जिंकला तर ग्रँडस्लॅम त्याच्या नावावर होईल. तो लवकरच जगातील अव्वल तीन खेळाडूंमध्ये येईल.’ १६ वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन जोकोविचला या लढतीसाठी एक दिवसाची अतिरिक्त विश्रांती मिळाली आहे. त्याने गुरुवारी उपांत्य फेरीत दुखापतग्रस्त फेडररचा पराभव केला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता थिएम चार मानांकित खेळाडूंना पराभूत करीत येथे दाखल झाला आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत राफेल नदालचा पराभव केला.
थिएम म्हणाला, ‘गेल्या दोन लढतींना महत्त्व नाही. तो (जोकोविच) ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतो आणि तो अंतिम फेरीत खेळेल असा मला विश्वास होता. मला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.’