शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर

By admin | Published: December 28, 2014 12:56 AM

कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या.

तिसरी कसोटी : स्मिथच्या १९२ धावांमुळे ५३० पर्यंत मजल; भारत १ बाद १०८ धावामेलबोर्न : कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने सलग तिसरे शतक ठोकूृन भारतीय गोलंदाजीच्या उणिवा चव्हाट्यावर आणल्या. त्याने १९२ धावांची खेळी करताच आॅस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५३० पर्यंत मजल गाठली. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सुरेख खेळ केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुरली विजयच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर १ बाद १०८ अशी वाटचाल केली. भारत अद्याप ४२२ धावांनी मागे असून, विजय ५५ आणि चेतेश्वर पुजारा २५ धावांवर खेळत होते. शिखर धवन २८ धावा काढून बाद झाला. आॅस्ट्रेलियाने सकाळी ५ बाद २५९ वरून पुढे खेळ सुरू केला. स्मिथने सातव्या शतकासह १९२ धावा ठोकल्या. त्याने ब्रॅड हॅडिन(५५)सोबत सहाव्या गड्यासाठी ११० आणि रेयॉन हरिस(७४)सोबत आठव्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. तळाच्या फलंदाजांनीही उपयुक्त योगदान दिले. स्मिथ सात तास मैदानावर होता. त्याने ३०५ चेंडू खेळून १५ चौकार व २ षटकार हाणले. करियरमधील ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली.भारताकडून ईशांत शर्मा फ्लॉप ठरला. उमेश यादवने मात्र ३ गडी बाद केले. मोहम्मद शमी याने १३८ धावांत ४ गडी बाद केले. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला १३४ धावांत ३ गडी बाद करता आले. दुसऱ्या सत्रात स्मिथ- हॅरिस जोडीने वेगाने धावा काढल्या. अखेर अश्विनने धावांना आवर घालत हॅरिसला बाद केले. भारताच्या डावात हॅरिसने धवनला बाद केले. धवनने स्लिपमध्ये स्मिथकडे सोपा झेल दिला. मुरली आणि पुजारा यांनी त्यानंतर कुठलीही जोखीम न पत्करता सावध धावा काढल्या. भारताला मालिका बरोबरीत सोडवायची झाल्यास हा सामना कुठल्याही स्थितीत जिंकावा लागेल. त्यासाठी मुरली-पुजारा यांना मोठी खेळावी करावी लागेल. यजमान संघ ज्या खेळपट्टीवर इतक्या मोठ्या धावा उभारतो, तेथे भारतीय फलंदाज धावा काढण्यात कुठवर बाजी मारतील, यावर भारताच्या विजयाचे समीकरण विसंबून असेल. (वृत्तसंस्था)विजयचा विक्रममुरली विजय आॅस्ट्रेलियात मालिकेत तीनपेक्षा अधिक अर्धशतके नोंदविणारा पहिला भारतीय ओपनर बनला. त्याने माजी सलामीवीर सुनील गावस्कर आणि के. श्रीकांत यांना मागे टाकले.गावस्करने १९७७ च्या दौऱ्यात तीन अर्धशतके ठोकली.श्रीकांतने ८६ च्या दौऱ्यात ही कामगिरी केली.मोठी धावसंख्या उभारू‘आम्ही प्रतिस्पर्धी फलंदाजांना लवकर गुंडाळू इच्छित होतो. पण स्टीव्हन स्मिथने समर्थ खेळी करीत आम्हाला बॅकफूटवर आणले. आम्ही अधिक धावा दिल्या हे खरे आहे, पण मोठी खेळी करू शकतो. खेळपट्टीवर नजर टाकल्यास या धावा अधिक नाहीत. खेळपट्टी मंद आणि पाटा झाली आहे. याचा लाभ घेत उद्या आम्ही चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी करणार आहोत.’ - रविचंद्रन अश्विनधोनीचा विक्रममहेंद्रसिंग धोनीने शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात कारकीर्दीतील १३४ वी स्टंपिंग करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा नवा विक्रम नोंदविला.धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव : ख्रिस रॉजर्स झे. धोनी गो. शमी ५७, डेव्हिड वॉर्नर झे. धवन गो. यादव ००, शेन वाटसन पायचित गो. अश्विन ५२, स्टीव्हन स्मिथ त्रि. गो. यादव १९२, शॉन मार्श झे. धोनी गो. शमी ३२, ज्यो बर्न्स झे. धोनी गो. यादव १३, ब्रॅड हॅडिन झे. धोनी गो. शमी ५५, मिशेल जॉन्सन यष्टिचित धोनी गो. अश्विन २८, रेयॉन हॅरिस पायचित गो. अश्विन ७४, नाथन लियॉन त्रि. गो. शमी ११, ज्योश हेजलवुड नाबाद ००, अवांतर : १६, एकूण : १४२.३ षटकांत सर्वबाद ५३० धावा. गडी बाद क्रम: १/०, २/११५, ३/११५, ४/१८४, ५/२१६, ६/२३६, ७/३७६, ८/४८२, ९/५३०, १०/५३०. गोलंदाजी : शर्मा ३२-७-१९४-०, यादव ३२.३-३-१३०-३, शमी २९-४-१३८-४, अश्विन ४४-९-१३४-३, विजय ५-०-१४-०.भारत पहिला डाव : मुरली विजय खेळत आहे ५५, शिखर धवन झे. स्मिथ गो. हॅरिस २८, चेतेश्वर पुजारा खेळत आहे. २५, अवांतर ००, एकूण: ३७ षटकांत १ बाद १०८ धावा. गडी बाद क्रम: १/५५. गोलंदाजी: मिशेल जॉन्सन ९-३-२४-०, रॅन हॅरिस ७-३-१९-१, हेजलवुड ९-४-१९-०, वाटसन ४-०-१४-०, नॅथन लियॉन ८-०-३२-०.