शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
2
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
3
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
4
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
5
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
6
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
7
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
8
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
9
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
10
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
11
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
12
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
13
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
14
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
15
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
16
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
17
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
18
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
19
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर

आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय

By admin | Published: September 10, 2016 3:46 AM

मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले.

कोलोंबो : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले. यासह आॅस्टे्रलियाने टी२० मालिकेत २-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे, कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या तिलकरत्ने दिलशानला विजयी निरोप देण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला. गतसामन्यात विक्रमी नाबाद शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवताना २९ चेंडूत ७ चौकार आणि चार षटकारांसह ६६ धावांची वेगवान खेळी केली. शिवाय कर्णधार डेव्हीड वॉर्नरनेही २४ चेंडूत २५ धावांची खेळी करुन मॅक्सवेलसह ९३ धावांची दमदार सलामी दिली. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य आॅस्टे्रलियाने १७.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यातही मॅक्सवेलने विक्रमी खेळी करताना १८ चेंडूत अर्धशतक पुर्ण करुन आॅस्टे्रलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने गेल्या सामन्यातील स्वत:चाच १९ चेंडूत अर्धशतकाचा विक्रमही मागे टाकला. (वृत्तसंस्था)>संक्षिप्त धावफलक :श्रीलंका : २० षटकात ९ बाद १२८ धावा (धनंजय डिसिल्व्हा ६२, कुसल परेरा २२; अ‍ॅडम झम्पा ३/१६, जेम्स फॉल्कनर ३/१९) पराभूत वि. आॅस्टे्रलिया : १७.५ षटकात ६ बाद १३० धावा (ग्लेन मॅक्सवेल ६६, डेव्हीड वॉर्नर २५; तिलकरत्ने दिलशान २/८)