मुंबई : स्वयम इब्रामपूरकरच्या शानदार खेळाच्या जोरावर रुस्तमजी इंटरनॅशनल संघाने शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा कार्यालयच्या वतीने झालेल्या मुंबई उपनगर (अंधेरी तालुका) आंतर शालेय टेबल टेनिस स्पर्धेत रुस्तमजी शाळेने रुस्तमजी केंब्रिज शाळेचा ३-१ असा पराभव केला.गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे झालेल्या या अंतिम सामन्यात इंटरनॅशनलच्या ओम्कार घाडीगावकरने अरीन खोतचा १३-११, ९-११, ११-४, ११-९ असा पराभव करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात स्वयम इब्रामपूरकरने तनिष्क ओकला ११-४, ११-५, १३-११ असे नमवत संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सामन्यात मात्र केंब्रिजच्या गौरव कक्करने चमकदार खेळ करताना अथर्व थामोरचा १२-१०, ११-८, ११-८ असा पराभव करून संघाची पिछाडी १-२ अशी कमी केली. या वेळी केंब्रिज संघाकडून पुनरागमनाची आशा होती. परंतु, पुन्हा एकदा स्वयमने आक्रमक खेळ करीत अरिन खोतचा ११-४, ११-६, ११-७ असा धुव्वा उडवून संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी, उपांत्य सामन्यात इंटरनॅशनल संघाने पी. बोधीनी संघाचा ३-१ असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता; तर केंब्रिज संघाने लक्षधाम शाळेचा ३-० असा धुव्वा उडवला होता. (क्रीडा प्रतिनिधी)उपांत्य फेरीतही स्वयमने आपल्या दोन्ही एकेरीच्या लढती जिंकताना पी. बोधीनीविरुद्ध इंटरनॅशनल संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. ओम्कार घाडीगावरकरनेही स्वयमला चांगली साथ दिली.
‘रुस्तम’च्या जेतेपदामध्ये स्वयम चमकला
By admin | Published: September 20, 2016 4:12 AM