हॉंगकॉंग : गतवर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नराळेने शनिवारी अभिमानास्पद कामगिरी केली. हॉंगकॉंग येथे सुरू असलेल्या युवा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत अवंतिकानं सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार रोवला. तिनं ११.९७ सेकंदच्या वेळेसह १०० मीटर शर्यतीत बाजी मारली.
कबड्डी पहिलं प्रेम..खेलो इंडियामध्ये अवंतिकाने १२.३६ सेकंदासह सुवर्ण जिंकले होते. अका वर्षात तिने आपल्या वेळेत बरीच सुधारणा केली. पण ॲथलेटिक्स हे अवंतिकाची पहिली आवड नव्हती. ती पहिली कबड्डीपटू होती, परंतु तिच्यातील गती पाहता प्रशिक्षक शिवाजी मेहता यांनी तिला ॲथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. इयत्ता आठवीपासून ती ॲथलेटिक्सचा सराव करत आहे.