शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Asian Games 2023 : महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने वाढवली देशाची शान! जिंकले ऐतिहासिक सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 8:09 PM

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातल्या अविनाश साबळे ( Avinash Sable) याने आशियाई स्पर्धा २०२३ मध्ये इतिहास रचला. भारतीय लष्करात असलेल्या अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेल ( अडथळ्यांची) शर्यतीत ८ मिनिटे १९.५०सेकंदाची वेळ नोंदवत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. तो आशियातील सर्वात वेगवान ३००० मीटर स्टीपलचेसपटू ठरला.  अविनाशने २०१८ च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत इराणच्या होसेन केहानीचा ८ मिनिटे २२.७९ सेकंदाचा चा आशियाई विक्रम मोडला.

३००० मीटर स्टीपल चेस स्पर्धेत अविनाशने सुरुवातीपासूनच गती सेट केली आणि पहिल्या ५० मीटरमध्ये उर्वरित खेळाडूंना मागे टाकले. त्याने शेवटपर्यंत हा वेग कायम ठेवला आणि २०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला १२ वे सुवर्णपदक मिळवून दिले आणि स्टीपल चेस स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवले. अविनाश आता आशियाई क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर शर्यतीतही सहभागी होणार आहे. अविनाश ६ किलोमीटर धावत शाळेत जायचा अविनाशच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो इंडियाना आर्मीमध्ये दाखल झाला. लष्करासाठी अविनाशने सियाचीनच्या बर्फाळ हिमनदीपासून ते राजस्थानच्या वालुकामय भागापर्यंत देशाची सेवा केली. आर्मीमध्ये असताना २०१५ मध्ये त्याने अॅथलीट होण्याचा निर्णय घेतला. १३ सप्टेंबर १९९४ रोजी महाराष्ट्रातील मांडवा गावात जन्मलेला हा तरुण आता देशाची शान बनला आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अविनाशला लहानपणी शाळेत जाण्यासाठी ६ किलोमीटर चालत जावे लागे, त्यामुळे तो धावतच जायचा आणि तेथूनच त्याच्यात रेसिंगची आवड कायम राहिली. २०१७ मध्ये, आर्मीचे प्रशिक्षक अमरीश कुमार यांनी अविनाशला स्टीपल चेसमध्ये धावण्यास सांगितले आणि त्यानंतर अविनाशने मागे वळून पाहिले नाही.

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३Maharashtraमहाराष्ट्र