ऑनलाइन लोकमतरांची, दि. 20 - कोणत्याही कसोटी संघाच्या कर्णधारासाठी रविंद्र जडेजा सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचं पुन्हा एकदा त्याने सिद्ध केले आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील रांची कसोटीच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात जाडेजाच्या एका अप्रतिम चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ चुकला आणि क्लिनबोल्ड झाला. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेला त्याचा चेंडू बॅटऐवजी पॅडने अडवण्याचा स्मिथचा प्रयत्न त्याची दांडीच उडाली.रांची कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी आठ बळींची गरज होती. स्टीव्ह स्मिथ हा या वाटेतील मोठा अडथळा ठरू शकत होता. त्यानं मॅट रेनशॉसोबत आज डावाची सुरुवात केली आणि 20 ओव्हर टिच्चून खेळून काढल्या. पण 29 व्या ओव्हरमध्ये ईशांत शर्मानं रेनशॉला पायचीत करत कांगारूंची अवस्था 3 बाद 59 अशी केली. रेनशॉ बाद झाल्यानंतर स्मिथवर दबाव वाढला आणि या दबावाचा फायदा घेत जाडेजाने पुढच्याच षटकात स्मिथला क्लिनबोल्ड करत सामन्यावर पकड मिळवून दिली. जाडेजाने टाकलेला चेंडू एवढा अप्रितम होता की , नेमकं काय झालं, हे स्मिथ कळलं नाही.कसोटीचा पाचवा दिवस ऑस्ट्रेलियाच्या 58 धावांच्या आघाडीसह 6 बाद 204 असा संपला. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्श (52) आणि पीटर हॅण्ड्सकॉम्ब (नाबाद 72) यांनी पाचव्या विकेटसाठी 124 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचून सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवून दिले. तर भारताकडून रविंद्र जडेजाने 54 धावांमध्ये 4 विकेट्स घेऊन भारताच्या विजयी आशा पल्लवित केल्या होत्या. अश्विन आणि शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
अप्रतिम ! स्मिथ पुन्हा एकदा झाला सर जाडेजाचं गिऱ्हाईक
By admin | Published: March 20, 2017 5:36 PM
कोणत्याही कसोटी संघाच्या कर्णधारासाठी रविंद्र जडेजा सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचं पुन्हा एकदा त्याने सिद्ध केले आहे
जडेजा vs कर्णधार-
1.इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक- 6 वेळेस आउट
2. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क- 5 वेळेस
3. द. अफ्रीकेचा कर्णधार हाशिम अमला- 3 वेळेस
4. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ- 3 वेळेस