शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

अयाना, लेगेसेने जिंकली ‘दिल्ली’, भारतीय गटात नीतेंद्र सिंग, सुरिया विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:49 AM

नवी दिल्ली : इथिओपियाच्या अलमाज अयाना हिने प्रथमच दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत महिला गटाचे विजेतेपद पटकावले.

नवी दिल्ली : इथिओपियाच्या अलमाज अयाना हिने प्रथमच दिल्ली हाफ मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होत महिला गटाचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटात इथिओपियाच्याच बेरहानू लेगेसेने बाजी मारली. भारतीय गटात नीतेंद्र सिंग व एल. सुरिया यांनी सुवर्णपदक पटकावले. दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धकांनी मोठ्या संख्येने हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.महिला गटात दहा हजार मिटर स्पर्धेत जागतिक विक्रम नावावर असलेली आॅलिम्पिकविजेती अयानाने ही स्पर्धा १ तास ७ मिनिटे व ११ सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला.पुरुष गटात लेगेसेने ५९ मि. ४६ से. ही स्पर्धा पूर्ण करत जेतेपद पटकावले. अनाडामलाक बेलिहूने (इथिओपिया) ५९ मिनिटे ५१ सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेच्या लियोनार्ड कोरिर ५९ मि. ५२ सेकंदात स्पर्धा पूर्ण करत तिसरा आला. आॅलिम्पिकपटू नीतेंद्र सिंग रावतने १ तास ३ मि. ५३ से. वेळ नोंदवत भारतीय गटात विजेतेपद पटकावले. दुसºया क्रमांकावरील लक्ष्मणनेही हीच वेळ नोंदवली, मात्र फोटोफिनिश तंत्रज्ञानाद्वारे तो दुसºया क्रमांकावर राहिला. महाराष्टÑाच्या अविनाश साबळेने पदार्पणातच तिसरा क्रमांक पटकावले.भारतीय महिला गटात एल. सुरियाने नवा स्पर्धा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. सुरियाने १ तास १० मिनिटे ३१ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली. दुसºया क्रमांकावर सुधा सिंग (१ तास ११ मिनिटे ३० सेकंद) तर तिसरा क्रमांक पारुल चौधरीने (१ तास १३ मिनिटे ९ सेकंद) पटकावला.>नीतेंद्रसिंगची अ‍ॅथलिट संघटनेवर टीकाभारतीय गटातील विजेता नीतेंद्रसिंंग रावत याने राष्टÑीय शिबिरात आपल्याला स्थान न दिल्याबद्दल टीका केली. त्याची कामगिरी चांगली नाही, असे कारण देत पुढील वर्षी होणाºया राष्टÑकुल व आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठीच्या राष्टÑीय शिबिरात नीतेंद्रसिंगचा समावेश करण्यात आला नाही. नीतेंद्र सिंग म्हणाला, की मी येथे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आलो होतो. राष्टÑीय शिबिरासाठी माझ्या नावाचा विचार झाला नाही. मी राणीखेत येथे माझ्या अकादमीत सराव करत आहे.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन