नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघाच्या वतीने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी मल्ल बबिता कुमारी, अमित कुमार दहिया आणि बजरंग यांच्या नावाची शिफारस केली आहे.डब्ल्यूएफआईचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले, ‘आम्ही बबिता कुमारी, अमित कुमार आणि बजरंग यांच्या नावाची शिफारस केली आहे’. २५ वर्षांची बबिता ही मल्ल महिला फ्री-स्टाइलच्या ५५ वजन किलो गटात खेळते. मागच्या वर्षी तीची कामगिरी अंत्यत चांगली राहिली होती. तीने ग्लास्गो येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक देखील पटकावले होते.उदयोन्मुख मल्ल २१ वर्षीय अमित याने २०१२ साली लंडन आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भारताकडून प्रतिनिधित्व करणारा तो सर्वांत तरुण मल्ल होता. त्याने सन २०१३ साली झालेल्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक जिंकले होते. तसेच राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेत पुरुष फ्री-स्टाइलच्या ५७ किलो वजन प्रकारात सुवर्णपदक देखील प्राप्त केले होते. बजरंग हा मल्ल देखील २१ वर्षाचा उदयोन्मुख मल्ल आहे. तो ६१ किलो वजन गटात सहभागी होतो. त्यानेही ग्लास्गो राष्ट्रमंडल आणि आशियाई स्पर्धेत पदक जिंकले होते. (वृत्तसंस्था)
बबिता, अमित, बजरंग यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
By admin | Published: May 13, 2015 12:04 AM