नवी दिल्ली : आपल्या तुफान फलंदाजीच्या जोरावर सध्या क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या स्टार विराट कोहलीने कमाईचे मैदानही गाजवले आहे. फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सी आणि जागतिक अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकाविक यांना मागे टाकत कोहलीने जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक मार्केटेबल (कमाई करणारा) खेळाडूचा मान पटकावला आहे. क्रीडा व्यापारावर संशोधन करणाऱ्या एका कंपनीने तीन वर्षांत मार्केटमध्ये खेळाडूंच्या क्षमतेनुसार ही क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये पैसा, वय, देशांतर्गत बाजार, चमत्कारिक प्रदर्शन आणि बाजारात उतरण्याची इच्छा या गोष्टींचा समावेश आहे. या क्रमवारीत एनबीएतील सर्वाधिक महागडा खेळाडू स्टीफन करी आणि युवेंट्स संघाचा फ्रान्सीस फुटबॉलर पॉल पोग्बा यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तर या दोघांनंतर थेट कोहलीने तिसऱ्या स्थानी कब्जा केला आहे. विशेष म्हणजे या बाबतीत कोहलीने दिग्गज गोल्फर जॉर्डन स्मिथलाही मागे टाकण्याची ‘विराट’ कामगिरी केली आहे, तर जोकोविच २३व्या स्थानी आणि मेस्सी २७व्या स्थानी आहे. तसेच जगातील सर्वांत वेगवान व्यक्ती म्हणून नावाजलेला धावपटू उसेन बोल्ट ३१व्या स्थानी आहे. यामध्ये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही स्थान मिळवले असून, ती ५०व्या स्थानी आहे. २०१४ साली या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फॉर्म्युला वन चॅम्पियन लुईस हैमिल्टनची यंदा घसरण झाली आहे. तसेच २०१२ व २०१३ अशी सलग दोन वर्षे अव्वल स्थान राखलेला ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारची यावेळी आठव्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे २०११ साली उसेन बोल्ट, तर २०१० साली एनबीए स्टार लेबोर्न जेम्स यांनी अव्वल स्थान मिळवले होते. (वृत्तसंस्था)प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रत्येक सामन्यात कामगिरी उंचावण्याची संधी असते असे मी मानतो. खडतर मेहनत आणि शिस्तीला दुसरा पर्याय नाही. प्रत्येक क्रिकेटरला संघातील आपल्या जागेविषयी असुरक्षितता वाटते आणि त्याचवेळी चुका होतात. तुम्ही चांगले प्रदर्शन करु इच्छिता. मात्र मैदानात व बाहेर तुम्ही नियंत्रण गमावता. वेळेनुसार सुधारणा होते आणि त्यानंतर तुम्ही लय मिळवता. - विराट कोहली
कोहलीने मेस्सीला टाकले मागे
By admin | Published: May 28, 2016 4:00 AM