शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बजरंग, रितूने जिंकले सुवर्ण

By admin | Published: December 31, 2015 3:24 AM

बजरंग पुनिया आणि रितू फोगट या भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखताना आपापल्या गटात अपेक्षित सुवर्णपदक पटकावले.

नवी दिल्ली : बजरंग पुनिया आणि रितू फोगट या भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखताना आपापल्या गटात अपेक्षित सुवर्णपदक पटकावले. बजरंगने पुरुषांच्या ६४ किलो वजनी गटात एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण जिंकले, तर रितूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण कमाई केली. दखल घेण्याची बाब म्हणजे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा आयोजनातील ढिसाळपणा समोर आला. लढत संपल्यानंतरही त्या लढतीचे निकाल कोणालाही कळाले नव्हते. दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात सुशील कुमार व नरसिंग यादव यांची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. मात्र, या गटात या दोन्ही अव्वल मल्लांच्या अनुपस्थित मिळालेल्या संधीचे सोने करताना हरियाणाच्या जितेंदरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, प्रदीपला या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मनोज व दिनेश यांनी कांस्यपदकाची कमाई केली. ६५ किलो वजनी गटातही याच प्रकारच चित्र पाहायला मिळाले. अव्वल मल्ल योगेश्वर दत्तच्या अनुपस्थित बजरंगने आपला हिसका दाखवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या धडाक्यापुढे रजनीशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, मनोज आणि भगत सिंग यांनी कांस्य पटकावले. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात संदीप तोमर आणि रवींद्र यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताची सर्वांत अनुभवी खेळाडू रितूने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण कमावले. तिच्या आक्रमकतेपुढे अपर्णा बिश्नी हिने रौप्य, तर पूजा आणि निर्मल यांना कांस्य पटकावण्यात यश आले. त्याचप्रमाणे ५८ किलोवजनी गटात आणि ६३ किलो वजनी गटात अनुक्रमे सरिता आणि अनिता यांनी अव्वल स्थान पटकावले. (वृत्तसंस्था)