बिश्केक, किर्र्गिस्तान : गतविजेता बजरंग पुनिया याने वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपच्या समारोपाच्या एक दिवस आधी येथे पुरुषांच्या ६५ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदकाची कमाई केली. येथे भारताने आज दोन पदके मिळवली.विनोद कुमार ओमप्रकाश याने ७० किलो गटात फ्री स्टाईल प्रकारात कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत आठ पदके पटकावली आहेत.त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे.बजरंग याला उपांत्यपूर्व फेरीत जापानच्या दाईची ताकातानी याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र ताकातानी हा अंतिम फेरीत पोहचल्याने रेपचेज फेरीत बजरंग याने ताजिकिस्तानच्या अब्दुलकोसीम फेयेजीव याला पराभूत केले आणि कांस्य पदकाच्या सामन्यात ईराणच्या योंस अली अकबर इम्माचोगेई याला १०-४ ने पराभूत करत विजय मिळवला.विनोद याला उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या इखतियोर नावरुजोव कडून पराभव पत्करावा लागला.त्याने कांस्यपदकाच्या लढतीत किर्गिस्तानच्या एलामन डोगडुर्बेक उलुला कडवी टक्कर दिली. विनोद याने अखेरच्या क्षणी गुण मिळवत विजय प्राप्त केला. विनोद आणि किर्गिस्तानचा खेळाडू ३-३असे बरोबरीत होते. मात्र अखेरच्या क्षणी विनोदने विजय खेचून आणला.नवज्योतच्या घरी जल्लोषचंडीगढ : वरिष्ठ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणाºया जिंकणारी देशातील पहिली महिला पैलवान बनलेल्या नवज्योत कौर हिच्या घरी जल्लोष करण्यात आला. पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील असलेल्या नवज्योतच्या बहिणीने सांगितले की,‘आम्हाला तिच्या यशावर अभिमान आहे. तिच्या ऐतिहासिक विजयाने आम्ही आनंदित आहोत.’
आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये बजरंग, विनोदला कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 2:03 AM