नवी दिल्ली : प्रतिष्ठेचा राजीव गांधी ‘खेलरत्न’ पुरस्कार नाकारल्याबद्दल नाराज झालेला स्टार मल्ल बजरंग पुनियाने सरकारविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.बजरंगने यंदा गोल्ड कोस्ट राष्टÑकुल व जकार्ता आशियाडमध्ये सुवर्ण जिंकले. याच आधारे भारतीय कुस्ती महासंघाकडून त्याची खेलरत्नसाठी शिफारस करण्यात आली होती. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या यादीनुसार क्रिकेटपटू विराट कोहली व विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना संयुक्तपणे ‘खेलरत्न’ दिला. बजरंगने यावर तीव्र नाराजी दर्शविली. तो म्हणाला,‘ मी फार नाराज आहे. योगेश्वर दत्तसोबत उद्या क्रीडामंत्र्यांना भेटणार असून माझ्याकडे कानाडोळा का करण्यात आला, याचे कारण जाणून घेईन. मी पात्र असेल तरच मला हा पुरस्कार द्या, अशी आपली मागणी आहे.’
बजरंग जाणार न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 1:43 AM