ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 20 - डोपिंगमध्ये दोषी आढळल्याच्या कारणांवरुन प्रतिबंधित असलेली रशियाची टेनिसपटू मारिया शारापोवा हिच्यावरील बंदी उठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दोनवेळेची फ्रेंच ओपन चॅम्पियन शारापोवावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली. ती यंदा फ्रेंच ओपन खेळणार की नाही, याचा निर्णय १५ मे रोजी होणार आहे. पुढील आठवड्यात होणाºया स्टुटगार्ट डब्ल्यूटीए स्पर्धेसाठी शारापोवाला वाईल्ड कार्ड देण्यात आले. या निर्णयावर अनेक खेळाडू नाराज झाले. शारापोवाला माद्रिद तसेच रोममध्ये क्ले कोर्टवर खेळण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने शारापोवा फ्रेंच ओपनसाठी सज्ज होऊ इच्छिते. पण निर्णय विरोधात गेल्यास गर्भवती असलेल्या व्हीनस विलियम्ससोबत शारापोवासारख्या दिग्गज खेळाडूची ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत यंदा उणीव जाणवेल.