ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 22- शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं धोनीच्या रायझिंग पुणे सुपरजाएंट संघावर १३ धावांनी विजय मिळवला. बंगलोरनं 186 धावांचं बचाव करताना पुण्याला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 172 धावांवर रोखले. पुण्याकडून सलामीवीर अजिंक्य रहाणे(60), कर्णधार धोनी(41), परेरा(34) यांचे प्रयत्न विजयासाठी कमी पडले. पुण्याची तगडी फलंदाजी बंगलोरच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर फिकी पडली. बंगलोरकडून रिचर्डसनं ३ षटकात13 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना बाद केले. शेन वॅटसननं 2 फलंदाजांना तंबूत परतवले. या विजयासह बंगलोरनं आयपीएलच्या 9व्या पर्वातील दुस-या विजयाची नोंद केली. त्यापुर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा कर्णधार विराट कोहली व ए.बी. डिव्हीलियर्स यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजी करत धोनीच्या राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघासमोर १८६ धावांचे आव्हान ठेवले. विराट कोहलीने ६३ चेंडूत ८० धावा केल्या. तर, डिव्हीलियर्सने ४६ चेंडूत ८३ धावा केल्या.महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहूलला थिसारा परेराने सात धावांवर बाद करत चांगली सुरुवात केली. मात्र त्यानंतर आलेल्या ए.बी. डिव्हीलियर्सने कर्णधार विराट कोहलीसह पुण्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ही जोडी फोडण्यासाठी धोनीने सर्व पर्याय वापरुन पाहिले.डिव्हिर्लस् ७० धावांवर असताना आर. अश्विनच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल अंकित शर्माला पकडता आला नाही. विराट कोहलीने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करताना ६३ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ८० धावा फटकावल्या. परेराने त्याला बाद केले.त्यानंतर लगेचच डिव्हिलर्सही बाद झाला. परेराच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल यावेळी मात्र अंकितने अचूक टिपला. डिव्हिर्लसने ४६ चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह ८३ धावांचा तडाखा दिला. सर्फराज (२) तर वॉटसन (१) धावांवर नाबाद राहीला. बंगळूरुने तीन गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा उभारल्या. पुण्याकडून परेरा (३/३४) हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला.
थरारक सामन्यात बंगलोरचा पुण्यावर विजय
By admin | Published: April 22, 2016 11:37 PM