ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. 9- रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीनं निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा केल्या आहेत. कॅप्टन कोहलीनं धडाकेबाज खेळी करत 21 चेंडूंत 2 चौकारांसह 20 धावा काढून चांगली सुरुवात करून दिली. व्हिलेनियरनं 5 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर अर्धशतक झळकावले. राहुल 42, वॉटसन 1, सचिन 33, हेड 11 धावा काढून तंबूत परतले आहेत. राहुलनं आरसीबीकडून सर्वाधिक 6 चौकार मारले आहेत. पंजाबकडून करियप्पानं राहूल आणि कोहलीला तंबूत धाडल्यानं 175 धावांवर आरसीबीला रोखणं पंजाबला शक्य झालं आहे.