शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

पुण्याचं बंगळुरुसमोर 192 धावाचं लक्ष्य

By admin | Published: May 07, 2016 5:43 PM

रायझिंग पुणे सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. बंगळुरुने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता

ऑनलाइन लोकमत - 
बंगळुरु, दि. 07 - रायझिंग पुणे सुपरजायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. बंगळुरुने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पुण्याने दमदार सुरुवात करत सुरुवातीपासून बॉलर्सना हिट करण्यावर लक्ष केंद्रीत केलं होतं. 26 धावांवर पहिली विकेट गेली असताना दुस-या विकेटसाठी अजिंक्य रहाणे आणि सौरभ तिवारीने 106 धावांची पार्टरनशिप केली. सौरभ तिवारीने 39 बॉलमध्ये 52 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणेने 48 बॉलमध्ये 74 धावा केल्या. 
 
पुणे 200 धावा सहजर करेल असं वाटल असताना शेवटच्या ओव्हर्समध्ये झटपट विकट गेल्याने पुण्याने बंगळुरुला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये पुणे फक्त 29 धावा करु शकलं. शेन वॉट्सनने उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 ओव्हर्समध्ये फक्त 24 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. शेन वॉट्सनने धोनी आणि रहाणेच्या महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
 
आयपीएलच्या नवव्या पर्वात खराब कामगिरीमुळे त्रस्त असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंटस्विरुद्ध एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळत आहे. हा सामना म्हणजे धोनी- विराटच्या नेतृत्वगुणांची ‘परीक्षा’ मानला जात आहे.
 
उभय संघात चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, पण दोन्ही संघ कामगिरीत फ्लॉप ठरले. पुण्याने दिल्लीला नमवित विजयी पथावर येण्याचे संकेत दिले खरे, पण संघाचा नऊ सामन्यांत हा जेमतेम तिसराच विजय होता. बंगळुरूने सातपैकी केवळ दोन सामने जिंकल्याने सातव्या स्थानावर घसरला. दोन्ही संघांना विजयाशिवाय पर्याय नाही. कारण आणखी एक पराभव म्हणजे स्पर्धेबाहेर होणे असे समीकरण तयार आहे. 
 
स्टीव्हन स्मिथ, फाफ डुप्लेसिस, केव्हिन पीटरसन, मिशेल मार्श हे सर्वजण जखमी होऊन बाहेर पडले. अंतिम ११ खेळाडू निवडताना धोनीची दमछाक होत आहे. अजिंक्य रहाणे, सौरभ तिवारी, तिसारा परेरा, अशोक डिंडा हे मात्र कामगिरीत सातत्य राखून आहेत. यांच्याच कामगिरीमुळे संघाची इभ्रत शाबूत राहिली. रहाणे आणि उस्मान ख्वाजा यांनी दमदार फलंदाजी केली, तर रजत भाटियाने टिच्चून मारा केला. धोनीदेखील मधल्या फळीत योगदान देण्याचे प्रयत्न करीत आहे. अश्विन मात्र गोलंदाजीत अद्याप चमकताना दिसत नाही. पुण्याकडे चुका सुधारण्याची संधीही आता उरली नसल्याने गोलंदाजांना धावा रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
 
बंगळुरु मागच्या सामन्यात कोलकाताकडून पाच धावांनी पराभूत झाला. स्पर्धेत सर्वांत चांगले गोलंदाज बंगळुरुकडेच असूनही हा संघ धावा काढल्यानंतरही धावांचा बचाव करण्यात अपयशीच ठरतो. संघाच्या पराभवात खराब क्षेत्ररक्षण आणि कमकुवत गोलंदाजी कारणीभूत ठरली. केकेआरविरुद्ध तबरेज शम्सीने चार षटकांत तब्बल ५१ धावा मोजून प्रतिस्पर्धी संघाला विजय दान केला. यजुवेंद्र चहल आणि शेन वॉटसन हे धावा रोखून गडी बाद करतात, पण दुसऱ्या टोकाहून त्यांना साथ मिळत नसल्याने पराभवाची निराशा पदरी पडत आहे.