शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

बांगला शेर झाले ढेर...

By admin | Published: May 31, 2017 12:52 AM

भुवनेश्वर कुमार (३/१३) आणि उमेश यादव (३/१६) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा

लंडन : भुवनेश्वर कुमार (३/१३) आणि उमेश यादव (३/१६) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशचा २४० धावांनी फडशा पाडला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३२४ धावांचा डोंगर उभारल्यानंतर, बांगलादेशचा अवघ्या ८४ धावांत खुर्दा उडवून दणदणीत विजय मिळवला. याआधीच्या सराव सामन्यातही न्यूझीलंडचा सहजपणे पराभव केल्याने प्रतिस्पर्धी संघांना भारताने धोक्याचा इशारा दिला आहे.केनिंग्टन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताच्या भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशचे वाघ सुरुवातीपासूनच धडपडले. केवळ मुस्तफिजूर रहीम (१३), मेहदी हसन मिराज (२४) आणि सुनझमुल इस्लाम (१८) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठण्यात यश आले. इतर सर्व फलंदाज केवळ हजेरी लावून परतले. बांगलादेशच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांनी वेगवान गोलंदाजीला पोषक वातावरणाचा फायदा घेत बांगलादेशच्या फलंदाजीला खिंडार पाडले. भुवीने १३ धावांत ३, तर उमेशने १६ धावांत ३ बळी घेतले. तसेच, महंमद शमी, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन आश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या व शिखर धवन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३२४ धावांचा डोंगर उभारला. कार्तिकने निवृत्त होण्यापूर्वी ७७ चेंडूंना सामोरे जाताना ८ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ९४ धावांची खेळी केली. त्याने धवनसोबत (६०) तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. पांड्याने अखेरच्या काही षटकांत हल्ला चढवताना ५४ चेंडूंमध्ये सहा चौकार व चार षटकारांसह नाबाद ८० धावा काढत भारताला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. त्याने रवींद्र जडेजासह (३२) सहाव्या विकेटसाठी १२.५ षटकांत ८६ धावांची भागीदारी केली. बांगलादेशतर्फे वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने ५० धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले, तर डावखुरा फिरकीपटू सुंजामुल इस्लामने ७४ धावांत दोन फलंदाजांना माघारी पाठवले. दरम्यान दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या रोहित शर्माचे अपयश भारतासाठी चिंतेची बाब ठरली. (वृत्तसंस्था)धावफलकभारत : रोहित शर्मा त्रि. गो. रुबेल हुसेन ०१, शिखर धवन झे. मेहदी हसन गो. सुंजामुल ६०, अजिंक्य रहाणे त्रि. गो. मुस्तफिजूर ११, दिनेश कार्तिक रिटायर्ड हर्ट ९४, केदार जाधव त्रि. गो. सुंजामुल ३१, हार्दिक पांड्या नाबाद ८०, रवींद्र जडेजा झे. शाकिब गो. रुबेल ३२, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. रुबेल ०५, भुवनेश्वर कुमार नाबाद ०१. अवांतर (९). एकूण : ५० षटकांत ७ बाद ३२४. गोलंदाजी : मुस्तफिजूर ८-०-५३-१, रुबेल हुसेन ९-०-५०-३, सुंजामुल ९-०-७४-२.बांगलादेश : इम्रूल कायस झे. यादव गो. भुवनेश्वर ७, सौम्या सरकार झे. कार्तिक गो. उमेश २; शब्बीर रहमान त्रि. गो. उमेश ०; मुस्तफिकूर रहीम झे. जडेजा गो. शमी १३, शाकिब-अल-हसन झे. रोहित गो. भुवनेश्वर ७; महमुदुल्लाह झे. कार्तिक गो. भुवनेश्वर ०; मोसद्देक झे. कार्तिक गो. उमेश ०; मिराज झे. कार्तिक गो. बुमराह २४, सुंजामुल झे. रोहित गो. आश्विन १८, तास्किन नाबाद १, रुबेल झे. रहाणे गो. पांड्या ०. अवांतर - १२. एकूण : २३.५ षटकांत सर्व बाद ८४ धावा.गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१३-३; उमेश यादव ५-१-१६-३; महंमद शमी ६-०-१७-१; जसप्रीत बुमराह ५-०-३२-१; हार्दिक पांड्या १.५-०-२-१; रविचंद्रन आश्विन १-०-२-१.