ऑनलाइन लोकमत
कार्डिफ, दि. 10 : करा किंवा मराच्या लढतीत बांगलादेशनं न्यूझीलंडचा पाच विकेटने पराभव केला आहे. आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर शाकिब अल हसन आणि महमद्दुल्लाह यांनी केलेल्या धडकाबाज शतकी खेळीच्या बळावर बांदलादेशने विजय खेचून आणला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने दिलेले 266 धावांचे आव्हान बांगलादेशने 48 व्या षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. बांदलादेशचे चौथ्या षटकात तीन फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर आलेल्या शाकिब अल हसन आणि महमद्दुल्लाह यांनी संयमी पण दमदार खेळीच प्रदर्शन करत विजय खेचून आणला. शाकिब अल हसन आणि महमद्दुल्लाह यांनी पाचव्या विकेटसाठी 224 धावांची विक्रमी भागिदारी केली. शाकिब अल हसनने 115 चेंडूत 114 धांवाची खेळी केली तर महमद्दुल्लाहने 107 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी करत विजय खेचून आणला. न्यूझीलंडकडून साऊथीने तीन बळी घेतले. बांगलादेशचा सेमीफायनलचा फैसला उद्या होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या सामन्यावर अलंबून आहे. उद्याच्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यास बांगलादेशला सरळ सेमीफायनलचे तिकीट मिळेल. जर ऑस्ट्रेलिया जिंकल्या धावगतीच्या आधारावर सेमीफायनलचा फैसला होईल.
त्यापूर्वी, नाणेफेक जंकून प्रथम फलंदाजी स्विकारणाऱ्या न्यूझीलंडला बांगलादेशच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच जखडून ठेवले. बांगलादेशकडून मोसादेन हुसैन सैकतने धारधार गोलंदाजी करताना तीन षटकात न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तसकीन अहमदने आपल्या फिरकिच्या बळावर दोन गडी बाद केले. मुस्तफिझिकूर रेहमान आणि रूबेल हुसेन यांनी प्रत्येकी एक बळी बाद केले. न्यूझीलंडकडून अनुभवी रॉस टेलरने सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. तर कर्णधार केन विल्यम्सने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघाव्यतिरीक्त एकाही न्यूझीलंडच्या फलंदाजाला आपली कमाल दाखवता आली नाही. गुप्तील 33, रॉन्ची 16, नील ब्रूम 36, जेम्स निशाम 23 यांनी थोडाफार संघर्ष केला. अष्टपैलू कोरी अँडरसन भोपळाही न फोडता माघारी परतला.