शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

बांगलादेश फायनलमध्ये; पाकिस्तान ‘आऊट’

By admin | Published: March 03, 2016 4:09 AM

सलामीवीर सौम्य सरकार (४८) याची शानदार खेळी आणि त्यानंतर कर्णधार मशर्रफे मोर्तझा (नाबाद १२) व महमुदुल्लाह (नाबाद २२) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने रोमहर्षक

मिरपूर : सलामीवीर सौम्य सरकार (४८) याची शानदार खेळी आणि त्यानंतर कर्णधार मशर्रफे मोर्तझा (नाबाद १२) व महमुदुल्लाह (नाबाद २२) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर बांगलादेशाने रोमहर्षक अंदाजात बुधवारी पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करताना आशिया कप ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १३० धावांचे लक्ष्य बांगलादेशाने १९.१ षटकांत ५ गडी गमावून १३१ धावा करून पूर्ण केले. स्पर्धेत सलग ३ विजयांसह भारताने आधीच अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. आता त्यांची विजेतेपदाची लढत यजमान बांगलादेशाशी होणार आहे.बांगलादेशाकडून सौम्य सरकारने ४८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ४८ धावा केल्या. विजयी चौकार मारणाऱ्या महमुदुल्लाहने १५ चेंडूंत २ चौकार व एक षटकार मारला, तर कर्णधार मोर्तझाने ७ चेंडूंत २ चौकार मारले. शब्बीर रहमानने १४ व यष्टिरक्षक फलंदाज मुश्फिकर रहीमने १२ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून मोहंमद आमिरने ४ षटकांत २६ धावा देऊन २ गडी बाद केले. मोहंमद इरफान, कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि अनुभवी शोएब मलिक यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.त्याआधी, बांगलादेशाने आशिया चषक ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला २० षटकांत १२९ धावांत रोखले. पाकिस्तानकडून सर्फराज अहमदने ४२ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. शोएब मलिकने ३० चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह ४१ धावा फटकावल्या. बांगलादेशाकडून अल अमीन हुसेन याने २५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अराफत सन्नी याने ३५ धावांत २ गडी बाद करीत साथ दिली. तस्कीन अहमद आणि मोर्तझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा ठरवताना बांगलादेशाच्या गोलंदाजांनी ८.२ षटकांतच त्यांची अवस्था ४ बाद २८ अशी दयनीय केली. अखेर सर्फराज अहमद आणि शोएब मलिक यांनी पाचव्या गड्यासाठी ४४ चेंडूंत केलेल्या ७० धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १२९ पर्यंत मजल मारता आली.धावफलक : पाकिस्तान : खुर्रम मन्झूर झे. मुशफिकुर रहीम गो. अल अमीन हुसेन १, शर्जील खान त्रि. गो. अराफत सन्नी १०, मोहंमद हाफीज पायचीत गो. मोर्तझा २, सर्फराज अहमद नाबाद ५८, उमर अकमल झे. शकीब अल हसन गो. तस्कीन अहमद ४, शोएब मलिक झे. शब्बीर रहमान गो. अराफत सन्नी ४१, शाहीद आफ्रिदी झे. शब्बीर रहमान गो. अल अमीन हुसेन ०, अन्वर अली झे. शब्बीर रहमान गो. अल अमीन हुसेन १३, अवांतर : ०, एकूण : २० षटकांत ७ बाद १२९. गोलंदाजी : तस्कीन अहमद ४-१-१४-१, अल अमीन हुसेन ४-०-२५-३, अराफत सन्नी ४-०-३५-२, मशर्रफे मोर्तझा ४-०-२९-१, शकीब अल हसन ४-०-२६-०. बांगलादेश : तमीम इकबाल पायचीत गो. इरफान ७, सौम्य सरकार त्रि. गो. आमिर ४८, शब्बीर रहमान त्रि. गो. आफ्रिदी १४, मुश्फिकर रहीम पायचीत गो. मलिक २२, शकीबुल हसन त्रि. गो. आमीर ८, महमुदुल्लाह नाबाद २२, मोर्तझा नाबाद १२, अवांतर : ८. एकूण : १९.१ षटकांत ५ बाद १३१. गोलंदाजी : आमिर ४-०-२६-२, इरफान ४-०-२३-१, सामी ४-०-३०-०, आफ्रिदी ४-०-२०-१, अली २.१-०-२५-०, मलिक १-०-३-१.