शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

By admin | Published: October 31, 2016 6:33 AM

अष्टपैलू शाकीब-अल-हसन यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर यजमान बांगलादेश्ने इंग्लंडवर रविवारी १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

मिरपूर : आॅफस्पिनर मेहंदी हसन मिराज आणि अष्टपैलू शाकीब-अल-हसन यांच्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर यजमान बांगलादेश्ने इंग्लंडवर रविवारी १०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऐतिहासिक विजयाबरोबरच बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.इंग्लंडवर कसोटीत विजय मिळवण्याची कसोटी इतिहासातील बांगलादेशची ही पहिली वेळ आहे. त्याचप्रमाणे २००० पासून कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर त्यांचा एकूण हा आठवा विजय ठरला.इंग्लंड संघाने पहिल्या डावात २४४ धावा केल्या होत्या. बांगलादेशने दुसऱ्या डावात २९६ धावा करून पाहुण्या संघाला विजयासाठी २७२ धावांचे लक्ष्य दिले; परंतु इंग्लंडचा पूर्ण संघ ४५.३ षटकांत १६४ धावांत ढेपाळला. विजयाचा पाठलाग करताना इंग्लंडची एक वेळ १ बाद १०० अशी मजबूत स्थिती होती; परंतु मेहंदी हसन आणि शाकीब-अल-हसन यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडने पूर्ण शरणागती पत्करली आणि त्यांचे ९ फलंदाज ६४ धावांतच गमावले.इंग्लंडकडून अ‍ॅलिस्टर कुक (५९) आणि बेन डकेट (५६) यांनी अर्धशतक ठोकले; परंतु बेन बाद होताच संघाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कुक आणि डकेट यांच्याशिवाय बेन स्टोक्सने २५ धावा केल्या. इंग्लंडच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही.आॅफस्पिनर मेहंदी हसन मिराजने पहिल्या डावात ६ बळी घेतले होते आणि दुसऱ्या डावातही जादूई गोलंदाजी करताना ६ फलंदाजांना तंबूत धाडले. त्याने दुसऱ्या डावात २१.३ षटकांत ७७ धावांत ६ गडी बाद केले. याशिवाय अष्टपैलू शाकीब-अल-हसनने १३ षटकांत ४९ धावांत ४ फलंदाजांना तंबूत धाडले.१९ वर्षीय युवा स्पिनर मेहंदी हसन मिराजला त्याच्या शानदार कामगिरीबद्दल ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. >संक्षिप्त धावफलकबांगलादेश (पहिला डाव) २२० आणि दुसरा डाव २९६.इंग्लंड (पहिला डाव २४४), दुसरा डाव : ४५.३ षटकांत सर्व बाद १६४. (अ‍ॅलिस्टर कुक ५९, डकेट ५६, बेन स्टोक्स २५. मेहंदी हसन मिराज ६/७७, शाकीब-अल-हसन ४/४९).