मैदानात सामना सुरू असताना खेळाडूंनी खेळभावना दाखवणे गरजेचे असते. पण, अनेकवेळा काही अशा घटना घडतात, ज्यामुळे खेळाला गालबोट लागते. क्रिकेटमध्येही तुम्ही अनेकदा स्लेजींग किंवा तत्सम प्रकार पाहिले असतील. पण, एका सामन्यादरम्यान दोन संघांच्या खेळाडूंमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करण्याची पद्धत असते, पण हस्तांदोलन न केल्यामुळेच हा वाद उद्भवला. दोन दिग्गज बास्केटबॉल प्रशिक्षकांमध्ये झालेल्या या वादामुळे हा हाणामारीचा प्रकार घडला. मिशिगनचे बास्केटबॉल प्रशिक्षक जुवान हॉवर्ड आणि विनकॉन्सिन प्रशिक्षक ग्रेग गार्ड यांच्यात हस्तांदोलनामुळे हा वाद झाला आणि वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?बास्केटबॉलचा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू हस्तांदोलन करत होते, यादरम्यान ग्रेग गार्ड जुवान हॉवर्ड यांना हस्तांदोलन करत नाहीत. यामुळे वाद होतो आणि यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना मारहाण सुरू करतात. ज्याप्रमाणे WWE मध्ये हाणामारी होते, त्याच प्रमाणे या संघांमध्ये हाणामारी होते. नॉर्थ डकोटा स्टेट आणि ओरल रॉबर्ट्सच्या खेळाडूंचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.