शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

वर्णद्वेषाविरुद्धचा लढा तीव्र होतोय; दिग्गज खेळाडूकडून तब्बल 700 कोटींची मदत! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 11:41 AM

जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू झाला...

जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हिंसाचार सुरू झाला... कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अत्याचाराला पुन्हा एकदा वाचा फुटली आणि जगभरातून एक संतापाची लाट उसळली आहे. क्रीडा विश्वातील दिग्गजांकडूनही फ्लॉयड याच्या निधनाचा निषेध केला गेला. टेनिसपटू रॉजर फेडरर पासून ते क्रिकेटपटू डॅरेन सॅमी, ख्रिस गेल यांनीही वर्णद्वेषाविरोधात आवाज उचलला.

अनेक फुटबॉल क्लब्सनीही निषेध नोंदवताना अशा घटना रोखण्याचं आवाहन केलं. वर्णद्वेषाविरोधाचा हा लढा आणखी तीव्र होताना दिसत आहे. अमेरिकेतील दिग्गज बास्केटबॉलपटू ( NBA) मायकेल जॉर्डन यानं या लढ्याला बळकटी देण्यासाठी 100 मिलियन डॉलरचे म्हणजेच 700 कोटीहून अधिक रक्कमेची मदत जाहीर केली. वांशिक समानता आणि सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या संस्थांना हा निधी दिला जाणार असल्याची घोषणा जॉर्डन याने शनिवारी केली.

कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!  

BA दिग्गज खेळाडूनं सोशल मीडियावर एक निवेदन जाहीर केले. त्यानं लिहिलं की,''अंतर्भूत वर्णद्वेषाचा नाश करण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध संस्थांना पुढील दहा वर्षांच्या कालावधीत 700 कोटींचा निधी पुरवला जाईल.'' क्रीडापटूनं केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी मदत म्हटली जात आहे. ''हे 2020 वर्ष आहे आणि आमचे कुटुंबीय इतरांना प्रेरणा देण्यासाठी काम करत आहे. अजून बऱ्याच गोष्टी बदलायच्या आहेत. Black lives matter हे काही वादग्रस्त विधान नाही. जोपर्यंत देशातील वर्णद्वेष पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा सुरू ठेवणार,''असेही त्या निवेदनात म्हटले गेले आहे.   NBAमधील दिग्गज खेळाडू जॉर्डन याची संपत्ती जवळपास 1,58,68,54,50,000 इतकी आहे.    

विराट कोहलीच्या श्रीमंतीचा थाट; आलिशान बंगला पाहून म्हणाल,'वाह क्या बात है!'

समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी

Video: 'लाईव्ह मॅच विथ 3D इफेक्ट'; असा सामना कधी पाहिला नसेल, लागली पैज!

 

टॅग्स :george floydजॉर्ज फ्लॉईडBasketballबास्केटबॉल