बासेटेरे : वेस्ट इंडीज बोर्ड इलेव्हनविरुद्ध टीम इंडियाचा तीन दिवसीय दुसरा सराव सामना उद्या (गुरुवार)पासून सुरू होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ यानिमित्ताने सज्ज होणार आहे. फलंदाज आणि गोलंदाजांना या लढतीत हात अजमावण्याची मोठी संधी असेल. १२ जुलैपासून पहिल्या कसोटीला प्रारंभ होईल. त्याआधी अंतिम इलेव्हनमध्ये कुणाला संधी द्यावी, हे तपासून पाहण्यासाठी या लढतीकडे संघ व्यवस्थापन लक्ष देणार आहे. दोन दिवसांच्या पहिल्या सराव सामन्यात भारतीय खेळाडू प्रभावी कामगिरी करू शकले नव्हते. त्यामुळे मार्गदर्शक अनिल कुंबळे दुसऱ्या सराव लढतीकडे गांभीर्याने पाहात आहेत. जखमेतून सावरलेला मोहंमद शमी व भुवनेश्वर कुमार यांनी सुरुवात चांगली केली; पण लय कायम राखण्यात दोघांनाही अपयश आले. ईशांत शर्मा आणि उमेश यादव यांनादेखील कामगिरीत सुधारणा घडवून आणण्याची गरज आहे. मुंबईचा शार्दूल ठाकूर यालादेखील पदार्पणाचे वेध लागले आहेत. लेगस्पिनर अमित मिश्रा याने ४ बळी घेऊन सर्वांना चकित केले होते. आश्विन आणि जडेजा यांच्या तुलनेत मिश्राला स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. फलंदाजीत भारताची आघाडीची फळी भक्कम वाटते. राहुल आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी खेळी केली. चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनीदेखील धावा काढल्या; पण कर्णधार कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना फलंदाजीचा पुरेसा सराव मिळाला नव्हता. (वृत्तसंस्था)सेंट किट्स : विंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय खेळाडूंनी व्यस्ततेतून वेळ काढून सागरकिनाऱ्यावर मौजमजा केली. कोच कुंबळे आणि कर्णधार कोहली यांच्यासह सर्वच खेळाडू मंगळवारी सेंट किट्स तसेच नेव्हिस बीचवर दाखल झाले होते. खेळाडूंनी तेथे घालविलेले मौजमजेचे क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विराट, धवन, चेतेश्वर पुजारा आणि जडेजा हा आंनद साजरा करताना दिसत आहेत. कुंबळे खेळाडूंसोबत मित्राप्रमाणे वागत असले, तरी त्यांनी आचारसंहितादेखील लावली आहे.टेलरच्या जागी कमिन्ससेंट किट्स : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या जेरोम टेलरच्या जागी वेगवान गोलंदाज मिगुएल कमिन्स याला आगामी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. २५ वर्षांच्या कमिन्सने ४१ प्रथमश्रेणी सामन्यात ११६ बळी घेतले आहेत. यंदा आॅस्ट्रेलियाचा दौरा करणाऱ्या विंडीज संघात त्याचा समावेश होता; पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
उभय संघभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, उमेश यादव, ईशांत शर्मा, मोहंमद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी. वेस्ट इंडीज बोर्ड अध्यक्ष इलेव्हन : लियोन जॉन्सन (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, राजेंद्र चंद्रिका, रोस्टन चेस, जॉसन डावेस, शेन डारिच, शाय होप, डोमियन जेकब्स, कियोन जोसेफ, मार्किनो मायंडले, विशालसिंग, जोमेल वारिकन.