शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

मुंबई-बँगलोरची अस्तित्वाची लढाई

By admin | Published: May 11, 2016 2:46 AM

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे.

विश्वास चरणकर, बंगळुरूआयपीएलची लढाई आता अखेरच्या टप्प्यावर आल्याने प्रत्येक संघाला एकेक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रंगणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन्ही संघांसाठी विजय मिळविणे अत्यावश्यक बनले आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवल्यास आरसीबीचे आव्हान टिकून राहील, तर अंतिम चार संघांत पोहोचण्याच्या दृष्टीने विजयामुळे मुंबईची वाट सुकर होईल.दोन्ही संघांचे प्रत्येकी ९ सामने झाले असून मुंबई १०, तर आरसीबी ८ गुणांसह अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. आजचा सामना मुंबईने जिंकला तर ते चौथ्या स्थानावर जातील, आरसीबीने जिंकल्यास त्यांना पाचव्या स्थानावर जाण्याची संधी असेल. मुंबईला सध्या सलामीचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. पार्थिव पटेल आणि रोहित शर्मा हे दोघे आलटून-पालटून यशस्वी ठरत असले, तरी संघाला ओपनिंग पार्टनरशिप लाभत नाही, त्याचा मोठा तोटा होत आहे. आघाडीची फळी ढेपाळली, तर मधली फळी डाव सावरताना दिसत नाही. मधल्या फळीत पोलार्डची फलंदाजी केकेआरविरुद्धचा अपवाद वगळता फारशी बहरलेली नाही. गोलंदाजीत मॅक्लेनघन, बुमराह, हरभजनसिंग यांची कामगिरी चांगली होत आहे. टीम साउदीची गोलंदाजीही चांगली होत असली तरी फलंदाजीस बळकटी यावी, म्हणून त्याच्या जागी कोरी अँडरसनचा संघात समावेश होऊ शकतो. अतिरथी महारथींचा भरणा असलेला आरसीबी संघही यंदा पराभवाच्या फेऱ्यात अडकला आहे. गेलसारख्या दिग्गज खेळाडूला फॉर्मात नसल्यामुळे वगळावे लागले आहे. गोलंदाजीत शेन वॉटसन वगळता एकही नाव अव्वल दर्जाचे नसल्याने डेथ ओव्हर्समध्ये संघाला दणका बसत आहे. >उभय संघ यातून निवडणाररॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली (कर्णधार), शेन वॉटसन, ख्रिस गेल, एबी डिव्हिलर्स, मिचेल स्टार्क, डेव्हिड विस, श्रीनाथ अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरॉन, केदार जाधव, मनदीपसिंग, मॅडम मिल्ने, सर्फराझ खान, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, अबू नेचिम, सचिन बेबी, यजुवेंद्र चहल, सॅम्युअल बद्री, प्रवीण दुबे, इक्बाल अब्दुल्ला, विक्रमजित मलिक, अ‍ॅडम मिलन, परवेझ रसूल, लोकेश राहुल, विकास टोकस व केन रिचर्डसन.मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), किरॉन पोलार्ड, हरभजनसिंग, कोरी अँडरसन, अंबाती रायुडू, जोस बटलर, विनयकुमार, टीम साउदी, पार्थिव पटेल, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, मर्चंट डी लाँग, मिशेल मॅक्लनघन, अक्षय वाखरे, नितीश राणा, हार्दिक पंड्या, जे. सुचित, सिद्धेश लाड, श्रेयस गोपाळ, किशोर कामथ, दीपक पुनिया, कृणाल पंड्या व जितेश शर्मा.