शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

मुंबईसाठी वर्चस्वाची लढाई!

By admin | Published: November 02, 2014 12:57 AM

चेन्नईयन एक्स्प्रेसशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर मुंबई सिटीची अवस्था ‘आगीतून फुफाटय़ात’ अशीच झाली आहे.

आयएसएल : विजयाने बुस्ट झालेल्या केरळ ब्लास्टरचे आव्हान 
स्वदेश घाणोकर - मुंबई
चेन्नईयन एक्स्प्रेसशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर मुंबई सिटीची अवस्था ‘आगीतून फुफाटय़ात’ अशीच झाली आहे. त्यांना घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर आलेल्या केरळ ब्लास्टरशी मुकाबला करायचा आहे. रविवारी मुंबई सिटी आणि ब्लास्टर यांच्या नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवरील ही लढत दोन्ही संघांच्या वर्चस्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. त्यात ब्लास्टर संघाचा सहमालक सचिन तेंडुलकर असल्याने या लढतीत पाहुण्यांनाही यजमानांइतकाच प्रेक्षकांचा पाठिंबा मिळेल, हे नक्की.
चार सामन्यांत तीन पराभव पत्करणा:या मुंबईसाठी यापुढील प्रत्येक लढत ही प्रतिष्ठेची असल्याने त्यांच्या समोर विजयाशिवाय दुसरा पर्यायच उपलब्ध नाही. कर्णधार सय्यद रहिम नबी आणि निकोलास अनेल्का यांच्या कमबॅकने मुंबईला दिलासा मिळाला असला, तरीही या दोघांना चेन्नईयन संघासमोर चांगली कामगिरी करता आलेली नव्हती. चेन्नईयनविरुद्ध त्यांनी 4-2-3-1 अशी आखलेली रणनीती सपशेल अपयशी ठरल्याने केरळाविरुद्ध त्यांना यात बदल करणो अपेक्षित आहे. नबीमुळे बचाव भक्कम झाला असला, तरी पॅवेल सिमोव्स, पीटर कोस्टा, मॅन्युएल फ्रायड्रिक यांच्यातील सातत्याच्या अभावामुळे मुंबईच्या पदरी निराशा आली आहे. फ्रेडी लुंगबर्ग, जावी फर्नाडेज, अॅण्ड्रे मॉरित्झ या मिडफिल्डर्सवर पुन्हा एकदा मदार असेल. त्यांना निकोलस अनेल्का, डिएगो नदाया आणि सुभाष सिंह यांची साथ लाभेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. 
चेन्नईयन संघाकडून 5-1 असा दारूण पराभव पत्करणारा मुंबई संघ खचलेला आत्मविश्वास परत मिळविण्यासाठी प्रय}शील असेल.
गुणतालिकेत मुंबईपेक्षा केरळचे पारडे जड दिसत आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी एका विजयावर समाधान मानावे लागले असले, तरी जेतेपदाचे प्रबळ दावेदार अॅटलेटिको डी कोलकाता संघाला 1-1 अशा बरोबरीत रोखल्याने केरळ पाचव्या स्थानावर विराजमान आहे. या बरोबरीने केरळचा चार्ज झालेला आत्मविश्वास पुणो सिटी संघाविरुद्धच्या लढतीत सर्वानी पाहिला. पुण्याला त्यांच्याच घरच्या मैदानावर क्-1 अशा पिछाडीवरून मुसंडी मारून पराभूत करण्याची किमया केरळने सहज केली. त्यामुळेच मुंबईविरुद्ध त्यांनी चमत्कार केल्यास नवल वाटायला नको. केरळाचा हुकमी एक्का 
त्यांचा गोलकिपर डेविड बेंजामीन 
जेम्स हा आहे. त्याने आतार्पयत प्रतिस्पर्धी खेळाडूंचे 11 गोल 
अडविले आहेत. त्यामुळे ही 
भक्कम भिंत भेदण्याचे आव्हान मुंबईसमोर असेल. 
 
प्रेक्षक बुचकळ्यात ?
सचिन..सचिन. असा नारा लावणारे प्रेक्षक रविवारी बुचकळ्यात पडणार आहेत. कारण, आपल्या घरच्या मैदानाला पाठिंबा द्यायचा, की सचिन तेंडुलकरच्या केरळ ब्लास्टर संघाला, या द्विधा मनस्थितीत ते सापडले आहे. 
मॉरित्झ श्2 हय़ुम 
स्पध्रेत आतार्पयत सर्वाधिक गोल चेन्नईयन संघाच्या एलानो ब्लमर याच्या नाववर असले, तरी  रविवारच्या लढतीत मुंबईच्या अॅण्ड्रे मॉरित्झ आणि केरळच्या इयान हय़ुम यांच्यात टशन रंगणार आहे. गोल करण्याच्या यादीत हे दोघे अनुक्रमे 3 व 2 गोलसह दुस:या व तिस:या क्रमांकावर  आहेत.