ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 26 - जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयसीसीमध्ये एकाकी पडले आहे. आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने विरोध केलेल्या निधीवाटप आणि प्रशासनाबाबत प्रस्तावच्या प्रस्तावांवर बीसीसीआयला पराभव पत्करावा लागला.
प्रशासन आणि सांविधानिक बदलांविषयी मांडलेला प्रस्ताव आयसीसीच्या स्थायी सदस्यांनी 1-9 अशा मोठ्या फरकाने स्वीकारला. तर कळीचा मुद्दा ठरलेल्या आयसीसीमधील निधीवाटपाच्या प्रस्तावावरही बीसीसीआयला दारुण पराभव पत्करावा लागला. हा प्रस्ताव 2 विरुद्ध 8 मतांनी मान्य करण्यात आला. बीसीसीआयने या दोन्ही प्रस्तावांच्या विरोधात मतदान केले श्रीलंका क्रिकेट मंडळ वगळता इतर कुठल्याही क्रिकेट मंडळाने निधीवाटपाच्या प्रस्तावावर भारताची साथ दिली नाही. त्यामुळे आजच्या पराभवामुळे बीसीसीआय आयसीसीमध्ये एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
प्रशासनिक बदल आणि निधिवाटपाच्या प्रस्तावांवरील मतदान समाप्त झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, निधीवाटपात बदल करण्याच्या प्रस्तावाच्या बाजूने 8-2 असे मतदान झाले. तर प्रशासनिक बदलांच्या बाजूने 9-1 असे मतदान झाले. पण बीसीसीआयने या दोन्ही प्रस्तावांच्या विरोधात मतदान केले. कारण हे दोन्ही बदल आम्ही कदापि स्वीकारू शकत नाही. त्यामुळे सध्यातरी आमच्यासमोर सर्व प्रस्ताव खुले आहेत, एवढेच सांगू शकतो. आता आम्ही बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा बोलावणार असून, त्यात सदस्यांना सद्य परिस्थितीची माहिती देणार आहोत.