ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची निवड झाल्यानंतर आता सर्वकाही ठीक होईल असे वाटत असतानाच सपोर्ट स्टाप वरुन पुन्हा एकदा क्रीकेट विश्व ढवळून निघाले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांच्या समितीने झहीर खान आणि राहुल द्रविडच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवला नसून, त्यांचे कॉन्ट्रॅक्ट तूर्तास बासनात गुंडाळून ठेवले आहेत. सल्लागर समितीकडून सपोर्ट स्टाफमध्ये राहुल आणि झहीरची नावे सुचवण्यात आली आहेत पण मुख्य प्रशिक्षिक रवी शास्त्री यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असे क्रिकेट प्रशासकांच्या समितीने स्पष्ट केले. दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवल्याचे वृत्त आहे. भरत अरुणची टीम इंडियाचा गोलंदाजी कोच म्हणून नियुक्ती होणार आहे. क्रिकेट नेक्स्ट या वेबसाईटशी बोलताना बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबाबत खुलासा केला आहे. टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यापासूनच भरत अरुण टीम इंडियासोबत असेल असंही या अधिकाऱ्यानं यावेळी सांगितलं आहे.भरत अरुणची कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी झहीर खानची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. झहीरच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत बीसीसीआयनं नव्या चार सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 22 जुलैला झहीर आणि राहुल द्रविड संबंधी अंतिम निर्णय होण्याची शक्याता आहे. दरम्यान, बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे दौरा विशेष असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्रिर्मुर्तीने निवडलेल्या सहयोगी स्टाफवर प्रशासनिक समितीने (उडअ) प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यामधून आपले हात काढत त्यांची निवड ही परदेश दौऱ्यासाठी असेल असे स्पष्ट केले.सीएसीने व्यक्त केली राय यांच्याकडे नाराजी - क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गुरुवारी सीओए प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून नुकताज भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदांवर कलेल्या निवडीबाबत आपली नाराजी कळवली. ह्यराहुल द्रविड आणि झहीर खान यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यावर लादण्यात आली आहे असे दृश्य सध्या उभे केले जात आहे,ह्ण असे सीएसीने या पत्रात म्हटले आहे. सीएसीला केवळ मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे हक्क असताना त्यांनी त्यापलीकडे जाऊन राहुल द्रविड आणि झहीर खान यांचीही सल्लागार म्हणून निवड केली.
शास्त्रीपुढे BCCI झुकले, भरत अरुण होणार गोलंदाजी कोच
By admin | Published: July 16, 2017 5:14 PM