शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

बेन स्टोक्सने विश्वास सार्थ ठरवला

By admin | Published: May 04, 2017 12:42 AM

गुजरात लायन्सविरुध्द झळकावलेल्या जबरदस्त विजयी शतकाच्या जोरावर बेन स्टोक्सने केवळ रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या प्ले आॅफ फेरी

- अयाझ मेमन - गुजरात लायन्सविरुध्द झळकावलेल्या जबरदस्त विजयी शतकाच्या जोरावर बेन स्टोक्सने केवळ रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या प्ले आॅफ फेरी गाठण्याच्या आशा उंचावल्या नसून त्याने आपल्या या घणाघाती खेळीने संघाने मोजलेल्या मोठ्या किंमतीला न्याय देखील दिला. तब्बल १४.५ करोड रुपयांची घसघसीत रक्कम देऊन पुणे संघाने स्टोक्सला आपल्या संघात घेतले होते. विशेष म्हणजे यासह तो आयपीएलच्या दहा सत्रातील सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडूही ठरला. त्याचप्रमाणे स्टोक्सला मिळालेली किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्य बातमी तर ठरलीच, शिवाय या खेळाडूवरही प्रचंड दडपण आले. जेव्हा फ्रेंचाइजी एखाद्या खेळाडूंसाठी मोठी किंमत मोजत असते, तेव्हा त्या फ्रेंचाइजीला त्या किंमतीचा परतावाही अपेक्षित असतो. सध्या विजेतेपद जरी दूर असले तरी आरपीएस संघ मालक मात्र स्टोक्ससाठी मोठी किंमत मोजून कोणतीही चूक केली नसल्याचे सिध्द झाल्याने निश्चिंत असतील. स्टोक्स आधी आयपीएलमध्ये सर्वाधिक किंमत मिळवणारा परदेशी खेळाडू इंग्लंडचाच अँड्रयू फ्लिंटॉफ ठरला होता. पण तो जबरदस्त फ्लॉप ठरला होता आणि बहुतेक सामन्यांना तो दुखापतीमुळे मुकला होता. त्याचबरोबर आणखी एक स्टार खेळाडू आपल्या लौकिकाप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरला तो म्हणजे इंग्लंडचाच केविन पीटरसन. तो अनेक संघाकडून (बँगलोर, दिल्ली) खेळला पण आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्याचबरोबर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्यांमध्ये काही भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये आघाडीवर आहेत ते इरफान पठाण आणि पवन नेगी. इरफानला काहीवर्षांपुर्वी प्रत्येक मोसमासाठी जवळपास १.९ दशलक्ष डॉलर अशी मोठी किंमत मिळत होती. मात्र, यावर्षी त्याला कोणीही आपल्या संघात घेतल नाही. अखेर स्टार अष्टपैलू ड्वेन ब्रावो जखमी झाल्याने त्याच्या जागी इरफानला गुजरात संघाने आपल्या चमूत घेतले. दुसरीकडे नेगीने गेल्या दोन सत्रात जवळपास ८.५ करोड रुपयांची किंमत मिळवून लक्ष वेधले. पण यावेळी मात्र त्याला खूप कमी किंमत मिळाली. त्याचबरोबर या लीगमध्ये परदेशी खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिध्द करुन मोठी छाप पाडली. खरं म्हणजे अनेक प्रमुख परदेशी खेळाडूंनी लक्षवेधी खेळ करुन स्वत:ला सिध्द केले आहे. यामध्ये गेल, डिव्हिलियर्स, पोलार्ड, मलिंगा, वॉर्नर यांची नावे आघाडीवर घ्यावी लागतील. त्यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे.स्टोक्सबाबत म्हणायचे झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहते की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्याने पुण्याला दोन सामने स्वत:च्या ताकदीवर जिंकून दिले. (मुंबईविरुध्द चेंडूने आणि गुजरातविरुध्द फलंदाजीने). यासह त्याने स्वत:तील गुणवत्ता सिध्द केलीच, त्यासह त्याने आपल्यात यशस्वी होण्याची भूक किती मोठी आहे, हे देखील दाखवले. तसेच, या मोसमात कामगिरीतील सातत्य आणि त्याची महत्त्वाकांक्षा यावर स्टोक्सचे यश अवलंबून असेल. शिवाय त्याच्याकडून अशाच कामगिरीची उत्सुकता पुणे संघाला असेल.