लंडन : लंडनमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले, पण प्रतिस्पर्धी इंग्लंड संघानेही मानसिक कणखरतेचा परिचय देताना कसोटी ‘बॅलन्स’ राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेकीचा कौल मिळविल्यामुळे इंग्लंड संघ नशीबवान ठरला. त्यामुळे त्यांना ढगाळ वातावरणात पहिल्या दिवशी फलंदाजी करणे टाळता आले. भारताने प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करीत यजमान संघाला कोंडीत पकडले. खेळपट्टीचे स्वरुप बदलले असले, तरी भारतीय गोलंदाज भुवनेश्वरने अचूक मारा करीत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविले.भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या नव्या चेंडूने बॅलन्सची शतकी खेळी संपुष्टात आणताना भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्याच्या आशा कायम राखल्या. इंग्लंडची एकवेळ ४ बाद ११३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर बॅलन्स व मोईन अली (३२) यांनी पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. मोईन अलीला कामचलावू गोलंदाज मुरली विजयने माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर बॅलन्सही माघारी परतल्यामुळे इंग्लंडचा डाव अडचणीत आला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४३ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. जडेजा व मुरली विजय यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. शमी, ईशांत व स्टुअर्ट बिन्नी यांची बळींची पाटी कोरीच राहिली.त्याआधी, गॅरीच्या (५१) अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने चहापानापर्यंत पहिल्या डावात ४ बाद १२५ धावांची मजल मारली होती. भारताच्या पहिल्या डावात २९५ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. इंग्लंडची सुरुवातीला २ बाद ३१ अशी अवस्था झाली होती. कुमारने त्यानंतर इयान बेलला (१६) तंबूचा मार्ग दाखविला. रविंद्र जडेजाने जो रुटचा (१३) अडथळा दूर करीत चहापानापूर्वी भारताला चौथे यश मिळवून दिले. भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारापूर्वी इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी परतवले. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी इंग्लंडने २ बाद ५१ धावांची मजल मारली होती. भारताने पहिल्या डावात २९५ धावांची मजल मारली आहे.भुवनेश्वर कुमारने सुरुवातीला अॅलिस्टर कुक (१०) याला यष्टिरक्षक धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. इंग्लंडच्या कर्णधाराची निराशाजनक कामगिरी याही सामन्यात कायम राहिली. भुवनेश्वरने रचलेल्या सापळ्यात इंग्लंडचा कर्णधार अलगद सापडला. बाद होण्यापूर्वीच्या षटकात भुवनेश्वरने कुकविरुद्ध वर्चस्व गाजविले. त्यानंतर डावाच्या ११ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कुकला झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर चार षटकांनी दुसरा सलामीवीर सॅम रोबसन (१७) भुवनेश्वरचे लक्ष्य ठरला. त्यापूर्वी कालच्या ९ बाद २९० धावसंख्येवरून पुढे खेळताना भारताचा डाव आज २९५ धावांत संपुष्टात आला. बेन स्टोक्सने (२-४०) शमीला कुककडे झेल देण्यास भाग पाडले. कुकचा कसोटी कारकीर्दीतील हा १०० वा झेल ठरला. (वृत्तसंस्था)
भुवनेश्वरमुळे आशा कायम
By admin | Published: July 19, 2014 1:55 AM