१६० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर हाशिम आमला याला भुवनेश्वर कुमारने पायचित केले. आपल्या दुसऱ्या षटकांत भुवनेश्वरने पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला (१० धावा) वॉर्नरकरवी बाद करून पंजाबला मोठा धक्का दिला. यानंतर पुढचे तीन फलंदाज अफगाणअस्त्राने घायाळ झाले. इयान मोर्गनचा मोहम्मद नबीने १३ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर राशिद खानने एकाच षटकात डेव्हिड मिलर (१) आणि रिद्धीमान साहा (०) यांच्या दांड्या गुल करून पंजाबच्या शिडातील हवा काढून घेतली. पंजाबची अवस्था ५ बाद ६२ अशी झाली होती.एका बाजूला संघाची अशी वाताहत होत असताना सलामीवीर मनन व्होरा मात्र व्रतस्थ योद्ध्याप्रमाणे उभा होता. १५ व्या षटकानंतर मनन व्होराने आक्रमक धोरण स्वीकारले. शिखर धवनने मननला ८३ धावांवर जीवदान देऊन हैदराबादची धकधक आणखी वाढविली. विजयरेषेकडे सुरू असणारी मननची वाटचाल शेवटी भुवनेश्वरनेच थांबवली. एका स्लो फुलटॉसवर मननचे टायमिंग चुकले आणि तो पायचित झाला. त्याने ५० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९५ धावा केल्या. शेवटच्या षटकात ईशांतला बाद करुन सिद्धार्थ कौलने पंजाबचा डाव १५४ धावांत संपुष्टात आणला. तत्पूर्वी, पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शंभरी गाठायला हैदराबादला १५ व्या षटकाची वाट पाहावी लागली. केसी करियप्पाने ही जोडी फोेडली. ओझाला साहाने यष्टिचित केले. त्याने २० चेंंडूत ३४ धावा केल्या. मोहित शर्माच्या गोलंदाजीवर चौकार ठोकून वॉर्नरने किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सलग पाचवे अर्धशतक केले. तो आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा सलामीला येऊन शेवटपर्यंत नाबाद राहिला. संक्षिप्त धावफलकसनराइजर्स हैदराबाद २० षटकांत ६ बाद १५९ धावा (डेव्हिड वॉर्नर नाबाद ७०, नमन ओझा ३४,शिखर धवन १५, अक्षर पटेल २/३३, मोहित शर्मा २/२५, संदीप शर्मा, करियप्पा प्रत्येकी १ बळी.)किंग्स इलेव्हन पंजाब १९.४ षटकांत सर्वबाद १५४ धावा(मनन वोहरा ९५, इयोन मोर्गन १३, ग्लेन मॅक्सवेल १०, मोहित शर्मा १०, भुवनेश्वर कुमार ५/१९,राशिद खान २/४२,कौल, मो. नबी, हेन्रिक्स प्रत्येकी १ बळी.)
भुवनेश्वरचा पॉवर पंच, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पंजाबवर विजय
By admin | Published: April 17, 2017 11:39 PM
भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रोमहर्षक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव केला.
ऑनलाइन लोकमत
हेदराबाद, दि. 17 - किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सोमवारी अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात हैदराबादने ५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने दिलेल्या १६० धावांचे आव्हान पेलताना पंजाबने १९.४ षटकांत सर्वबाद १५४ धावा केल्या. किंग्स इलेव्हन पंजाबचा सलामीवीर मनन व्होराची ९५ धावांची खेळी पंजाबला विजय मिळवून देऊ शकली नाही. भुवनेश्वर कुमारने घेतलेले पाच बळी हैदराबादच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पर्पल कॅपधारी भुवनेश्वर कुमारला सामनावीरचा बहुमान देण्यात आला.