शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विचारमंथनाच्या ‘पिचवर’ बीसीसीआय!

By admin | Published: July 16, 2015 2:24 AM

चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवरील बंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी बीसीसीआय आगामी आयपीएल सत्रासाठी विचारमंथनाच्या ‘पिचवर’ उतरली आहे.

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवरील बंदीच्या झटक्यातून सावरण्यासाठी बीसीसीआय आगामी आयपीएल सत्रासाठी विचारमंथनाच्या ‘पिचवर’ उतरली आहे. संघटनेतील मोठे अधिकारी आता ही स्पर्धा ८ संघांसह खेळविण्यासाठी आपत्कालीन योजनेचा शोध घेत आहेत. आयपीएल संचालन परिषदेची रविवारी बैठक होईल. त्यापूर्वी बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी औपचारिक चर्चेला सुरुवात केली आहे. (वृत्तसंस्था)शुक्ला भेटले दालमियांनाकोलकाता : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघ जरी निलंबित झाले असले तरी संकटात सापडलेली इंडियन प्रिमियर लीग पुढिल वर्षी होईल. असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले....तर धोनीसह इतरांवर बोलीजर बीसीसीआयने नव्या संघांसाठी बोली आमंत्रित केली, तर चेन्नईसह राजस्थान रॉयल्समधील सर्व खेळाडूंना लिलावाचा ‘सामना’ करावा लागेल. या सर्व खेळाडूंवर नव्याने बोली लागेल. यामध्ये स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन, ड्वेन ब्राव्हो, फाफ डुप्लेसिस, शेन वॉटसन, स्टीव्ह स्मिथ, जेम्स फॉकनर, रवींद्र जडेजा, ब्रँडन मॅक्युलम, मायकल हसी आणि आशिष नेहरा यांचा समावेश असेल. खेळाडूंच्या लिलावाची नवी प्रक्रिया २०१७च्या आयपीएलपूर्वी होणार होती. मात्र, वर्तमान परिस्थितीमुळे बीसीसीआयला नियोजित कार्यक्रमात बदल करून पहिल्यांदाच लिलावाची प्रक्रिया करावी लागेल.आयपीएलची स्पर्धा ही आठ संघांचा समावेश असलेलीच व्हावी, यावर बीसीसीआय इच्छुक आहे. कारण, प्रसारक मल्टिस्क्रीन मीडिया यांच्यासोबत त्यांचा ६० सामन्यांचा करार आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून अधिक विचार केला जाईल. तसेच, बीसीसीआय दोन संघांना दोन वर्षांपर्यंत चालवू शकते. बंदीचा कालावधी संपल्यानंतर दोन्ही संघ पुनरागमन करू शकतात. नाही तर, दोन नव्या संघांचा शोध घेऊन खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्याचा पर्यायसुद्धा बीसीसीआयकडे आहे. कारण, कॉर्पाेरेटने आयपीएल संघ खरेदी करण्याची तयारी दाखविली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.