शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Vinesh Phogat Big Breaking : धक्कादायक! विनेश फोगाटला ऑलिम्पिकने अपात्र घोषित केले; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 12:12 PM

Vinesh Phogat disqualified Olympics 2024 News: ​​​​​​​विनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती.

पॅरिस ऑलिम्पिकमधून मोठी धक्कादायक बातमी येत आहे. विनेशने महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा ५-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतू ती ५० किलोच्या गटात बसत नसल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. (Vinesh Phogat disqualified)

Vinesh Phogat: विनेश फोगाटचे किती ग्रॅम वजन जास्त भरले, आता अपिलही नाही, पदकही नाहीविनेशला भारताची पहिली ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू बनण्याची संधी मिळाली होती. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याने भारतीयांना धक्का बसला आहे. विनेशचे वजन ५० किलोपेक्षा जास्त भरत आहे. रात्रभर तिचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र तरीही आज सकाळी तिचे वजन ५० किलो पेक्षा जास्त भरले. यामुळे विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

महिला कुस्ती 50 किलो गटातून विनेश फोगटच्या अपात्रतेची बातमी भारतीय संघाने शेअर करणे खेदजनक आहे, असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने म्हटले आहे. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करत आहे. तसेच तिच्यावर कोणतीही टीका केली जाऊ नये. यापुढे यावर काहीही बोलले जाणार नाही. आम्हाला अन्य खेळांवर लक्ष केंद्रीत करायचे आहे, असे असोसिएशनने म्हटले आहे. 

ऑलिम्पिकच्या १२८ वर्षांच्या इतिहासात फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली होती. आज फायनल होती. विनेशनं पहिल्यांदाच कुस्तीत ५० किलो वजनी गटात आव्हान दिलं होतं. त्याआधी ती ५३ किलो वजनी गटात खेळत होती. 

कॉमनवेल्थमध्ये ३ गोल्ड मेडलची मानकरी

विनेश फोगाटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग ३ गोल्ड मेडल जिंकले होते. २०१४ ग्लास्गो, २०१८ कोस्ट आणि २०२२ बर्मिंघम येथील स्पर्धेत गोल्ड पदक जिंकले होते. त्याशिवाय विनेशनं २०१८ मध्ये जकार्ता येथील एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलवर नाव कोरलं होतं. एशियन चॅम्पियनशिप २०२१ मध्येही विनेश फोगाटनं गोल्ड जिंकत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने ३ सिल्व्हर मेडलही जिंकले आहे. 

टॅग्स :Vinesh Phogatविनेश फोगटparis olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४