मुंबई : गेली अनेक वर्षे फुटबॉल शिबिरे आणि स्पर्धेच्या माध्यमातून या खेळाला वाव देणार्या बिपिन फुटबॉल अकादमीच्या वतीने आयोजित 34व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत शिबिराला 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. बिपिन फुटबॉलचे निमंत्रक सुरेंद्र करकेरा यांनी ही माहिती दिली. शिबिराचा उद्घाटन सोहळा 16 ऑक्टोबरला बोरीवली येथील एमसीएफ जॉगर्स मैदानावर होईल. या शिबिरानंतर त्यात सहभागी झालेल्या विविध केंद्रांच्या लढती आणि अंतिम सामना 31 डिसेंबर 2022 आणि 1 जानेवारी 2023 रोजी रंगेल. या शिबिरासाठी बोरीवली, वसई-विरार, कल्याण, कुर्ला, उल्हासनगर, कुलाबा, अंधेरी आणि मदनपुरा अशी केंद्रे असतील.
1 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलांना या शिबिरात प्रवेश मिळेल. या शिबिरांची केंद्रवार सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे - बोरीवली: शिबीर संचालक: कमलेश शृंगी (9819472440), प्रशिक्षक: फ्रान्सिस न्यून्स, स्थळ: एमसीएफ जॉगर्स पार्क फुटबॉल ग्राऊंड. मदनपुरा: संचालक: नासिर अन्सारी (9892882966), प्रशिक्षक: मोहम्मद युसूफ अन्सारी, स्थळ: वायएमसीए ग्राऊंड, मुंबई सेंट्रल. कुलाबा: संचालक : सुधाकर राणे (7666963035), प्रशिक्षक : सचिन नरसप्पा, स्थळ : कुलाबा बॅकबे ग्राऊंड. अंधेरी: संचालक : सिद्धार्थ साबापट्टी (7738450431), प्रशिक्षक: रणजित मटकर, स्थळ: अंधेरीचा राजा ग्राऊंड, आझाद नगर. वसई विरार: संचालक: रुडॉल्फ डीकुन्हा (7385482299), प्रशिक्षक: मार्टिन असीसी, स्थळ: सेंट झेवियर्स ग्राऊंड, सेंट मायकेल चर्चच्या समोर, माणिकपूर, वसई (प.) कल्याण: संचालक : थॉमस कॅटेलिनो (7400094248), प्रशिक्षक: थॉमस नाडर, स्थळ: मॅक्सी फुटबॉल ग्राऊंड. कुर्ला: संचालक : सलीम खान (9004810177), प्रशिक्षक: आदिल अन्सारी, स्थळ: काका बाप्तिस्ता ग्राऊंड, कलिना, सांताक्रूझ. उल्हासनगर: संचालक: श्याम खरात (8080906262), प्रशिक्षक: मोनप्पा मुल्या. स्थळ: बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ग्राऊंड.