अभिजित देशमुख: प्रत्येक राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाज स्पर्धकांनी अनेक पदके जिंकून देशाचे गौरव वाढविले आहे पण २०२२ चा राष्ट्रकुल स्पर्धेत हे पहायला भेटणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत पर्यायी खेळ असलेल्या नेमबाजीला २०२२ च्या बिर्मिगहॅम, इंग्लंड गेम्स मधून वगळण्याचा निर्णय बर्मिंगहॅम आयोजन समिती आणि राष्ट्रकुल गेम्स फेडेरेशन ने घेतला आहे. बर्मिंगहॅम शहरात शूटिंग रेंजच्या कमतरतेमुळे आणि आर्थिक दृष्टितून नवीन शूटिंग रेंज परवडणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक नेमबाज, माजी खेळाडू, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय शूटिंग फेडेरेशन, क्रीडा प्रेमीनी निराशा दर्शवली आहे. बर्मिंगहॅम आयोजन समिती आणि राष्ट्रकुल गेम्स फेडेरेशनच्या निर्णयामुळे नेमबाजी खेळाची लोकप्रियते वर परिणाम नक्कीच पडेल. भारत,ऑस्ट्रेलिया आणि बरीच देश आपल्या उत्कृष्ट नेमबाज स्पर्धकांना पाठ्वण्यापासून मुकणार आहे. तसेच राष्ट्रकुल सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत पदक मिळविण्याची संधी नाकारली जाईल.
बर्मिंगहॅम मध्ये शूटिंग रेंज नसले तरीही दुसऱ्या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव समितीने मांडला नाही. बऱ्याच खेळामध्ये पायाभूत सुविधा नसेलतर काही क्रीडा प्रकार दुसऱ्या शहरा मध्ये आयोजित केले जाते. उदानार्थ, २०१८ गोल्डकॉस्ट राष्ट्रकुल स्पर्धेवेळी ब्रिस्बेन तर २०१८ जकार्ता आशियाई स्पर्धेवेळी पालेमबंग येथे नेमबाजी स्पर्धा घेण्यात आली. इंग्लंड च्या मँचेस्टर शहराला २००२ राष्ट्रकुल स्पर्धचे यजमानपद लाभले होते त्यावेळी ३४० किलोमीटर दूर असलेल्या बिसले या गावात नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. २०१२ चा लंडन ऑलिंपिक वेळी बिसले दूर असल्या मुळे जवळच असलेल्या वूलविच येथील ब्रिटिश सेन्यचा रॉयल आर्टिलरी बॅरक्स मध्ये नेमबाजी स्पर्धा आयोजित केली होती. बिसले येथे राष्ट्रीय शूटिंग रेंज असून सगळ्या सोयी सुविधा व अनुभवी कर्मचारी उपलब्ध आहे. १० मीटर स्पर्धेची रेंज नसली तरीही कुठल्याही एका प्रदर्शनिय हॉल किंवा १५ मीटर च्या हॉल मध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. त्यामुळे कुठलीही गंभीर आर्थिक खर्च न लागतात नेमबाजी स्पर्धचे आयोजन शक्य आहे. डिसेंबर २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडेरेशन मदत देण्याची तयारी दर्शवली होती पण बर्मिंगहॅम आयोजन समिती आणि राष्ट्रकुल गेम्स फेडेरेशनने काही सल्ला सुद्धा घेतला नाही.
भारताचे नेमबाजी मधील वाढते वर्चस्व रोखण्याचे षडयंत्र??
कुठलीही स्पर्धा असो, नेमबाजी क्वचितच वगळण्यात येते. १९७४ च्या स्पर्धे पासून प्रत्येक राष्ट्रकुल खेळामध्ये नेमबाजीचा समाविष्ट राहिला आहे. गेल्या अनेक राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने नेमबाजीत सर्वात जास्त पदके जिंकली आहे. २०१८ गोल्डकॉस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारतने सर्वाधिक १७ पदके जिंकली त्यामध्ये ७ सुवर्णपदकचा समाविष्ट होता. इंग्लंडने ८ पदके जिंकली, त्यामध्ये केवळ २ सुवर्ण पदक आणि ती सुद्धा क्वीन्स प्राईझ या प्रकारांमध्ये जी राष्ट्रकुल स्पर्धा वगळता कुठल्याही स्पर्धेत समाविष्ट नाही. अनेक भारतीय युवा नेमबाजी कडे वळत आहे, १५-१६ वर्षीय स्पर्धक वर्ल्ड चॅम्पिअनशिप मध्ये भारतासाठी पदके जिंकत आहे. २०१८ च्या युवा ऑलिंपिक पदक तालिके मध्ये भारताने इंग्लंडला मागे पाडले. नेमबाजी मध्ये इंग्लंडला एकही पदक जिंकता आले नाही तर भारताने ४ पदके जिंकले, त्या मध्ये २ सुवर्णपदकांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेला अडथळे असताच, इंग्लंडने या अगोदर त्यावर तोडगा काढला आहे पण बिसले येथे सोयीसुविधा असूनही नेमबाजी स्पर्धा आयोजन न करण्यामुळे सर्वस्र टीका होत आहे. भारताचे अंतराष्ट्रीयस्तरावर वाढते वर्चस्व आणि इंग्लंडचा घसटता पायामुळे तर नेमबाजी स्पर्धा वगळण्यात आली, हा दृष्टीकोन सुद्धा नाकारता येत नाही.