मुंबई : मुंबईत प्रथमच झालेल्या ‘टॉवर रन’ स्पर्धेत शशी कुमार दिवेकर याने विक्रमी कामगिरी करताना अवघ्या 4 मिनिटे 23 सेकंदांमध्ये 3क् मजले सर करताना जेतेपद पटकावले. द्वितीय क्रमांकावर राहिलेल्या गणोश खोसे याने 4 सेकंद जास्त देत शर्यत पूर्ण केली. महिलांच्या गटात अदिती पाटील हिने 6 मिनिटे 56 सेकंदांत शर्यत पूर्ण करताना बाजी मारली.
सीआयआयच्या (भारतीय उद्योग महासंघ) वतीने नुकतीच मुंबईतील वल्र्ड ट्रेड सेंटर इमारतीमध्ये ही स्पर्धा पार पडली. 3क् मजले चढण्याच्या या शर्यतीमध्ये स्पर्धकांना एकूण 689 जिने चढायचे होते. या वेळी पुरुष खुल्या वैयक्तिक गटात शशी दिवेकरने मोक्याच्या वेळी वेग वाढवताना निर्विवाद वर्चस्व राखले. त्याचवेळी गणोश खोसे (4:27) आणि समीर सिंग (4:49) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर बाजी मारली.
महिलांच्या गटातदेखील चुरशीची लढत रंगली. अदिती पाटीलने संयमी सुरुवातीनंतर हळूहळू वेग वाढवताना सहज अग्रस्थान पटकावले. प्रणिका बनसोडेने 7 मिनिटे क्2 सेकंद अशी वेळ देताना अदितीला कडवी झुंज दिली. त्याचवेळी सईमानसा मुरलीधरन हिने 7:37 या वेळेत शर्यत पूर्ण करताना तृतीय स्थान पटकावले.
पुरुषांच्या सांघिक गटामध्ये पुण्याच्या स्वप्निल-निखिल-लंकेश-कयुम या चौकडीने अवघ्या 3 मिनिटे 14 सेकंदाची वेळ देत, तर महिलांच्या सांघिक गटामध्ये निशा-रंजना-तृष्णा-माया या संघाने 7:क्4 अशी वेळ
देत प्रथम स्थानावर कब्जा
केला. (क्रीडा प्रतिनिधी)